मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /चोरी करायला गेला अन् जीव गमावला, चोरासोबतच घडलं भयंकर; पाहून पोलीसही चक्रावले

चोरी करायला गेला अन् जीव गमावला, चोरासोबतच घडलं भयंकर; पाहून पोलीसही चक्रावले

एक चोरटा शनिवारी रात्री यंत्रमाग कारखान्यात चोरी करण्यासाठी आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात दरवाजात त्याचं डोकं अडकलं. प्रयत्न करूनही ते न निघाल्यानं जागीच त्याचा मृत्यू झाला.

एक चोरटा शनिवारी रात्री यंत्रमाग कारखान्यात चोरी करण्यासाठी आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात दरवाजात त्याचं डोकं अडकलं. प्रयत्न करूनही ते न निघाल्यानं जागीच त्याचा मृत्यू झाला.

एक चोरटा शनिवारी रात्री यंत्रमाग कारखान्यात चोरी करण्यासाठी आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात दरवाजात त्याचं डोकं अडकलं. प्रयत्न करूनही ते न निघाल्यानं जागीच त्याचा मृत्यू झाला.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Uttar Pradesh, India

  वाराणसी 28 नोव्हेंबर : देशातील अनेक शहरांमध्ये दररोज चोरीच्या असंख्य घटना घडत असतात. चोरटे अगदी हातसफाईने अशा प्रकारे चोरी करतात की, पोलिसांनाही त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. परंतु, कधीकधी चोरी करणं चोरट्यांच्या जीवावरही बेतु शकतं. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये अशीच एक घटना घडली आहे. चोरी करण्याच्या उद्देशानं शनिवारी रात्री एक चोरटा यंत्रमाग कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, दरवाजात अडकल्यानं त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार पाहून पोलिसांसह सगळेजण चक्रावून गेले.

  ‘नवभारत टाइम्स हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. आपण पकडलं जाऊ नये म्हणून मागे काहीही पुरावा न ठेवता चोरटे अगदी सराईतपणे चोरी करत असतात. बऱ्याचदा चोरीच्या घटनांमागील चोरटे पोलिसांच्या हातीही लागत नाहीत. परंतु, काहीवेळा ते स्वत:च जाळ्यात अडकून पकडले जातात. पण चोरी करताना एखाद्या चोरट्याचा मृत्यू होतो ही घटना खूप कमी वेळा घडते. उत्तर प्रदेशातील वाराणसीत एक चोरटा शनिवारी रात्री यंत्रमाग कारखान्यात चोरी करण्यासाठी आत घुसण्याचा प्रयत्न करत होता.

  काकाला मारलेल्या त्या आरोपीचा प्रताप; पोलिसांच्या वाहनाचा घडवून आणला अपघात, 7 गंभीर जखमी

  तितक्यात दरवाजात त्याचं डोकं अडकलं. प्रयत्न करूनही ते न निघाल्यानं जागीच त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे घटनास्थळी आले तेव्हा ही घटना पाहून सर्वजण चक्रावून गेले. कुणीतरी त्या चोरट्याला दरवाजात अडकून टाकल्यासारखा त्याचा मृतदेह तिथं लटकत होता. दुसरीकडे, चोरट्याची पत्नी रात्रभर त्याची प्रतीक्षा करत होती. पण तो न येता त्याचा मृतदेहच घरी नेण्याची वेळ आली.

  फटीत अडकल्यानं गुदमरून गेला जीव

  दरवाज्यात अडकून मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव जावेद असं आहे. 22 वर्षांचा हा युवक सारनाथ येथे एका यंत्रमाग कारखान्याच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न करत होता. आत जाताना आपण दरवाजात अडकले जाऊ, याचा अंदाज त्याला आला नाही. दरवाजात अडकल्यानंतर बराच वेळ त्याचा श्वास रोखला गेला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

  हिंगोली : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात कोंडून गंभीर मारहाण, VIDEO आला समोर

  पोलिसांनी सुरू केली चौकशी

  ही घटना सारनाथ पोलीस ठाण्याअंतर्गत दानियालपूर येथील ताडीखाना परिसरात घडली. त्या व्यक्तीला पाहून काही लोक चक्रावून गेले. काय करावे त्यांना कळत नव्हते. त्यांनी आरडाओरड करून परिसरातील इतर लोकांना बोलावून घेतले. पोलिसही तत्काळ घटनास्थळी पोहचले. मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

  स्थानिकांच्या मते, चोरीच्या उद्देशानं आत घुसत होता चोरटा

  जावेद चोरी करण्याच्या उद्देशाने यंत्रमाग कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न करताना त्याचा मृत्यू झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. परंतु, पोलिसांनी मात्र रिपोर्टमध्ये चोरीची शंका व्यक्त केलेली नाही. श्वास गुदमरल्यामुळे जावेदचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक कारण पोलिसांनी नोंद केलं आहे. पुढील तपासात इतर कारणं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  रात्रभर पत्नी करत होती प्रतीक्षा, सकाळी मृतदेह आणला

  पोलिसांनी जावेदचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. यंत्रमाग कारखान्याचे मालक निजाम म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून कारखाना बंद होता. जावेदच्या सवयी काही चांगल्या नव्हत्या. अनेकदा छोट्या चोऱ्या करताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. परंतु, तेव्हा कारवाई न करता त्याला सोडून देण्यात आले होते.

  First published:
  top videos

   Tags: Shocking news, Theft