नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : श्रद्धा वालकरची तिचा पार्टनर आफताब पुनावालाने हत्या करुन 36 तुकडे केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्व दिल्लीतील त्रिलोकपुरी आणि पांडव नगरमध्ये सापडलेल्या मानवी शरीराच्या अवयवांच्या प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली, त्याचे नाव अंजन दास आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंजनची पत्नी आणि सावत्र मुलाने त्याला दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून बेशुद्ध केले आणि नंतर त्याची हत्या केली. या प्रकरणाबाबत दिल्ली पोलिसांवर खूप दबाव होता. कारण, या प्रकरणातही श्रद्धा वालकरप्रमाणेच मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी पूनमचे लग्न सुखदेवसोबत झाले होते, जो दिल्लीला आला होता. जेव्हा पूनम सुखदेवला शोधण्यासाठी दिल्लीला आली, तेव्हा तिची भेट कल्लूशी झाली, ज्यापासून पूनमला 3 मुले होती. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विशेष सीपी रवींद्र यादव यांनी सांगितले की, दीपक हा तीन मुलांपैकी एक आहे. लिव्हर निकामी झाल्याने कल्लूच्या मृत्यूनंतर पूनम अंजन दास यांच्यासोबत राहू लागली. पूनमला माहित नव्हते की अंजन दास याचे बिहारमध्ये देखील कुटुंब आहे आणि त्यांना 8 मुले आहेत. पतीची हत्या का केली? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे घरगुती वाद हे प्रमुख कारण आहे. घरखर्चावरून वारंवार भांडणे होत असत. नंतर अंजन आपल्या सून आणि मुलीवर चुकीची नजर ठेवत असल्याचे महिलेला वाटल्याने तिने तिला मारण्याचा कट रचला. पोलिसांनी सांगितले की, मृत अंजन दास हा लिफ्ट ऑपरेटर होता, तो पूनम आणि तिचा मुलगा दीपक यांच्यासोबत राहत होता. दीपक हा अंजन दास यांचा सावत्र मुलगा आहे. अंजन जास्त कमावत नसे आणि अनेकदा भांडत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनमने सांगितले की, अंजन दासने त्याचा मुलगा दीपकच्या पत्नीवरही चुकीची नजर ठेवली होती. यावर दुसरा काही उपाय न मिळाल्याने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. वाचा - श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबला वडिलांची साथ? पोलिसांनी सांगितली Inside story कशी केली हत्या? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी आरोपी महिला पूनम आणि तिच्या मुलाने अंजन दास याला दारू प्यायला लावली आणि त्यात झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्यांनी त्याचा गळा कापला आणि रक्त पूर्णपणे वाहून जावे म्हणून एक दिवस मृतदेह घरातच ठेवला. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे 10 तुकडे केले, त्यापैकी 6 तुकडे मिळाले आहेत. रक्त साफ करून मृतदेहाचे तुकडे करून ते आळीपाळीने पॉलिथिनमध्ये फेकून दिले व डोके खड्ड्यात पुरले. पोलिसांनी सांगितले की, मार्च-एप्रिलपासून आई आणि मुलगा अंजन दास याच्या हत्येचा कट रचत होते. कारण ते त्याच्यावर नाराज होते. या लोकांनी अखेर मृत अंजनची कवटी ओळख पटू नये म्हणून खड्ड्यात टाकली. हत्येनंतर दोन-तीन दिवसांनी कवटी सापडली होती. वाचा : आणखी एक ‘श्रद्धा’! विवाहित मुस्लीम तरुणाने युवतीला फसवलं, बोलणं बंद करताच भयानक कांड असं फुटलं बिंग डीसीपी क्राइम अमित गोयल यांनी सांगितले की, 5 जून रोजी स्थानिक पोलिस स्टेशनला फोन आला की एका व्यक्तीच्या शरीराचे अवयव सापडले आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख पटवणे सर्वात कठीण गोष्ट होती. मात्र, पहिल्या 3-4 दिवसांत केवळ 6 शरीराचे अवयव सापडले. 8 ते 10 तुकडे केले असतील असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. 30 मेच्या रात्री अंजनची हत्या झाली आणि 2-3 दिवसांत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.
5 जून रोजी पांडव नगर येथील रामलीला मैदानातून मृतदेहाचे काही भाग सापडले होते. या हत्येचा खुलासा करण्यासाठी घरोघरी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासून मृताची ओळख पटवण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पूनम आणि तिचा मुलगा दीपक दिसत होते. अंजन दास 5-6 महिन्यांपासून बेपत्ता होता आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नव्हती. चौकशी केली असता ही बाब समोर आली. मृताचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत दोघांनी नकार दिला. मात्र, सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या कपड्यांच्या आधारे पोलिसांनी विचारपूस केली. यानंतर आई आणि मुलाने आपला गुन्हा कबूल केला.