जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ahmadnagar News : 'याचं श्रेय कुणाला..' अहमदनगरचे 'अहिल्यानगर' झाल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ahmadnagar News : 'याचं श्रेय कुणाला..' अहमदनगरचे 'अहिल्यानगर' झाल्यानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

अहमदनगरचे 'अहिल्यानगर'

अहमदनगरचे 'अहिल्यानगर'

Ahmadnagar News : औरंगाबद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी अहमदनगर, 31 मे : औरंगाबद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या घोषणेचे स्वागत केलं आहे. पण त्याचं श्रेय कुठल्या एका व्यक्तीने किंवा एका पक्षांना घेऊ नये, याच्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले असल्याचे रोहित पवार म्हणाले. काय म्हणाले रोहित पवार? अहमदनगर जिल्ह्याचे नाव हे अहिल्यानगर केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, आम्ही या गोष्टीचं स्वागत करतो. कोणताही जातीय धार्मिक व्यवहार न बाळगता सामान्यांच्या हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काम केलं आहे. त्यांचा जन्म चौंडी या ठिकाणी झाला आणि जिल्ह्याचे नाव हे त्यांच्या नावाने दिलं असेल तर त्याचे स्वागत आहे. पण त्याचं श्रेय कुठल्या एका व्यक्तीने किंवा एका पक्षांना घेऊ नये याच्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत. जो शासकीय कार्यक्रम झाला असं ते म्हणतात. तिथे सर्व नागरिक आले होते. त्यातले अनेक नागरिक हे कर्जत जामखेड नागरिक काही मान्यवर यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन जेवणाची भोजनाची जी व्यवस्था केली होती. वाचा - Ahmadnagar News : औरंगाबाद-उस्मानाबादनंतर अहमदनगरचं नामांतर, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा आमचं समाजकारण.. आम्ही जे करतो ते समाजकारण करतो. कारण त्या ठिकाणी आम्ही जेवणाची व्यवस्था केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. तिथे डॉक्टरांची व्यवस्था केली. रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. सरकारकडून तिथं हाराचं देखील नियोजन नव्हतं. हे सुद्धा गावकरी आणि आम्हाला करावं लागलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तिथे आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला वंदन करत असताना शूज काढल्यानंतर नियोजन सुद्धा योग्य पद्धतीने झालं नव्हतं हे आम्ही पाहिलं असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. गेल्या वर्षी जो कार्यक्रम केला तर कुठलेही राजकीय वक्तव्य आम्ही केलं नव्हतं. कार्यक्रम शासनाकडून झाला नव्हता. तो व्यक्तिगत लोकप्रतिनिधी आणि सर्वांनी मिळून केला होता. तो कार्यक्रम हा भाविकांसाठी होता. सामाजिक कार्यक्रम होता. जे समाज बांधव आहेत जे विविध क्षेत्रांमध्ये चांगलं काम करतात त्यांचा सत्कार गेल्या वर्षी आम्ही तिथे केला होता. त्याला आम्ही समाजकारण म्हणतो. राजकारण जर बोलत असतील तर त्यांचा त्या ठिकाणी असणारा विषय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात