अहमदनगर, 31 मे : औरंगाबद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगरच्या चोंडी येथे आले होते. यानंतरच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव लगेच मान्य केला.
🕟4.18pm | 31-05-2023 📍 Ahmednagar | संध्या. ४.१८ वा. | ३१-०५-२०२३ 📍 अहमदनगर
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 31, 2023
LIVE | पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव#Ahmednagar https://t.co/WHS91KqjOn
🕒 2:45 pm | 31-05-2023 | 📍Chondi, Ahmednagar | दु. २:४५ वा. | ३१-०५-२०२३ 📍 चोंडी, अहमदनगर.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 31, 2023
🔸पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ भेट, दर्शन, अभिवादन व शिल्पसृष्टी पाहणी
🔸Visit, darshan, tributes at Punyashlok #AhilyaDeviHolkar birthplace
🔸पुण्यश्लोक अहिल्या देवी होल्कर… pic.twitter.com/fZf6GNDlMB
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव | चौंडी, अहमदनगर https://t.co/QnTmu5p0W9
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 31, 2023
भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि राम कदम यांनी मागच्या बऱ्याच काळापासून अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर करावं अशी मागणी केली होती. तसंच काल रोहित पवारांनीही अहमदनगरच्या नामांतराची मागणी राज्य सरकारकडे केली होती. याआधी राज्य सरकारने औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं केलं होतं. आता या दोन शहरांनंतर अहमदनगरचंही नामांतर होणार आहे. नामांतराचा हा प्रस्वात आता मंत्रिमंडळात ठेवला जाईल आणि याबाबत केंद्र सरकारला कळवलं जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर होईल.

)







