मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अहमदनगर हादरलं! 13 वर्षीय मुलीवर 50 वर्षीय नराधमाचा अत्याचार; आईनेच मुलीला संबंध ठेवण्यास पाडलं भाग

अहमदनगर हादरलं! 13 वर्षीय मुलीवर 50 वर्षीय नराधमाचा अत्याचार; आईनेच मुलीला संबंध ठेवण्यास पाडलं भाग

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आपल्या समाजात असं करावं लागत असल्याचं सांगून आईकडून मुलीवर दबाव टाकण्यात आला. मात्र, मुलीने नातेवाईकांना याबद्दल सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. (Rape on Minor)

अहमदनगर 17 सप्टेंबर : आई ही आपल्या मुलांना प्रत्येक संकटातून बाहेर काढत असते. मुलांना काहीही सहन करावं लागू नये यासाठी आई अनेकदा स्वतःचा जीवही धोक्यात घालते. मात्र, अहमदनगरमधून आईच्या नात्याला काळिमा फासणारी एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीला परपुरूषाशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं. ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. यात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 50 वर्षीय नराधमाने अत्याचार केला. मुलीची आईही या गुन्ह्यात सहभागी असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महिलेनं आपल्या मुलीला जबरदस्तीने 50 वर्षीय व्यक्तीसोबत संबध ठेवण्यास भाग पाडलं आहे. नागपूर : पत्नीसोबत सतत व्हायचा वाद; कंटाळलेल्या पतीने मध्यरात्रीच भांडणाचा केला भयानक शेवट आपल्या समाजात असं करावं लागत असल्याचं सांगून आईकडून मुलीवर दबाव टाकण्यात आला. मात्र, मुलीने नातेवाईकांना याबद्दल सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर नातेवाईकाच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आबासाहेब भडांगे असं आरोपीचं नाव असून याप्रकरणात आरोपीसह मुलीच्या आईलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरेचा धाक दाखवत आपल्या पोटच्या तेरा वर्षीय मुलीला परपुरूषाशी शरीरसंबध ठेवण्यास आईने भाग पाडलं. आईने धमकावल्याने भेदरलेल्या मुलीने आपल्यावर होणारा अत्याचार सहन केला. मात्र पुन्हा अत्याचाराचा प्रयत्न झाल्यावर तिने कशीबशी आपली सोडवणूक केली आणि नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर रानडुक्कराचा हल्ला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर आठवीत शिकणा-या या निरागस मुलीला आपली आई आपल्याला काय करायला लावते याची पुसटशी कल्पनाही नव्हती. मात्र आईचा धाक आणि नराधमाच्या अत्याचाराला ती बळी पडली. 'वयात आल्यानंतर परपुरूषाबरोबर झोपावं लागतं. आपल्या समाजाची ही प्रथा आहे. मी पण तेच केलं, असं सांगून या आईने आपल्या मुलीला परपुरुषासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं.
First published:

Tags: Crime news, Rape, Shocking news

पुढील बातम्या