साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर, 13 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-भाजपसोबत राज्यात सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता तिन्ही गटात खातेवाटपावरुन मॅरोथॉन बैठका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी काही नेत्यांनी दिल्लीवारीही केली. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. ते अहमदनगर येथे बोलत होते. दिल्ली पुढे महाराष्ट्र आणि सह्याद्री कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही : रोहित पवार मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मंत्र्यांचे खातेवाटप यावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. खाती वाटपासंदर्भात भेटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल, अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. यावर बोलताना रोहित पवार यांनी टीका केली आहे. महाराष्ट्र आणि सह्याद्री दिल्ली पुढे कधी झुकला नाही. पण दिल्लीच्या वाऱ्या पाहिल्या तर कुठेतरी दुःख वाटतं.
दिल्ली पुढे महाराष्ट्र आणि सह्याद्री कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही : रोहित पवार#rohitpawar pic.twitter.com/kTa86QaG1I
— News18Lokmat (@News18lokmat) July 13, 2023
शिवसेना आणि भाजपामधील अनेक आमदार मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, त्यांच्याही पदरात काही पडले नाही. वर्षभरात शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या वक्तव्याचा आधार घेत शिंदे गटाला आता एक भाकर मिळणार होती. त्यात आता अर्धी भाकर मिळणार आहे. अर्ध्याचा तुकडा कधी होईल हे त्यांनाही समजणार नाही, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. वाचा - डिजेवर ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ गाणं अन् जेसीबीतून फुलांची उधळण, धनुभाऊंचं ग्रँड वेलकम VIDEO सुजय विखे यांचा गाढा अभ्यास… : रोहित पवार नगर दक्षिणचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी नुकतीच कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. यावर रोहित पवार यांनी पलटवार करत शेलक्या शब्दात विखे पाटील यांना टोला लगावला आहे. पक्ष बदलणाऱ्या लोकांनी माझ्यावर जास्त बोलू नये, अशी थेट टीका रोहित पवार यांनी केली.
काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार यांनी सुजय विखे यांना वर्मी घाव घातला आहे. रोहित म्हणाले, खासदार सुजय विखे पाटील यांचा फार मोठा गाढा अभ्यास आहे, त्यावर मी काय बोलणार, त्या वादात मला जायचं नाही. उगाच काहीतरी स्टेटमेंट देत असतो. काही स्टेटमेंट बदलत असतो. आपण जेव्हा काँग्रेसमध्ये होता, तेव्हा तुम्हाला काँग्रेसकडून किंवा राष्ट्रवादीतून तिकीट मिळणार होतं. तेव्हा तुम्ही भाजपाच्या विरोधात बोलत होतात. निवडणूक लढवण्यासाठी त्यावेळेस तुम्ही विचार बदलले. तेव्हा तुम्हाला माझ्या विचारांवरती किंवा माझ्यावर बोलण्याचा किती अधिकार आहे? पक्ष बदलणाऱ्या लोकांनी माझ्यावर जास्त बोलू नये, असेही रोहित पवार म्हणाले.

)







