जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / dhananjay munde : डिजेवर 'राष्ट्रवादी पुन्हा...' गाणं अन् जेसीबीतून फुलांची उधळण, धनुभाऊंचं ग्रँड वेलकम VIDEO

dhananjay munde : डिजेवर 'राष्ट्रवादी पुन्हा...' गाणं अन् जेसीबीतून फुलांची उधळण, धनुभाऊंचं ग्रँड वेलकम VIDEO

(धनंजय मुंडे)

(धनंजय मुंडे)

dhananjay munde : बीडच्या पाटोदा शहरात क्रेनसह तब्बल 7 जेसीबीच्या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

  • -MIN READ Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 13 जुलै : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला साथ देत सत्तेत सामील झाले आहे. अजित पवारांसह 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा मंत्री झाले आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार धनंजय मुंडे आज बीडमध्ये पोहोचले. यावेळी धनुभाऊंचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. धनंजय मुंडे हे बीडमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी धनुभाऊंचं जल्लोषात स्वागत केलं आहे. सत्ता समीकरणांच्या बदलानंतर राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्याने बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

जाहिरात

अहमदनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये येताना पहिलेच गाव असलेल्या धानोरा आणि कडा गावामध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. तर धानोरा ,कडा ,आष्टी, जामखेड पाटोदा बीड, वडवणी, केज अंबाजोगाईसह परळीमध्ये सत्कार करण्यात आला आहे. जेसीबी मशीनमधून धनंजय मुंडे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

बीडच्या पाटोदा शहरात क्रेनसह तब्बल 7 जेसीबीच्या माध्यमातून मंत्री धनंजय मुंडेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली. युवक जिल्हाध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर नेतृत्वाखाली जंगी स्वागताचे आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी केली होती. काठी आणि घोंगड देऊन पारंपारिक पद्धतीने स्वागत दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचे बीड शहराजवळील मांजरसुंबा येथे जेसीबी मधून फुलांची उधळण करत तोफांची आदेश बाजी देत जंगी स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते नारायण बप्पा शिंदे यांनी यावेळी पारंपारिक काठी आणि घोंगड हातात देऊन वतीने धनंजय मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. शरद पवार हे आमचे देव आहेत त्यांचा फोटो टाकणार - धनंजय मुंडे दरम्यान, बीड जिल्ह्याने पंचवीस वर्षाच्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा सत्कार हे पाहतोय. मन भरून आलं. पवार साहेब आमचे देव आहेत आणि त्यांचा फोटो टाकणारे भक्ताचं काम आहे. बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आहे आणि कायम राहील. देव विसरला तरी भक्त विसरणार नाही. पवारांचा फोटो वापरणारच, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात