प्रियांका बोबडे, प्रतिनिधी अहमदनगर, 16 फेब्रुवारी: प्रत्येकाला आपल्या शहराबद्दल विशेष आत्मीयता असते. आपलं शहर सर्वांच्या नजरेत चांगल असाव, चांगलं राहावं, यासाठी अनेकजन प्रयत्न करत असतात. असाच एक प्रयत्न अहमदनगरमधील तीन चित्रकारांनी मिळून केला आहे. त्यांनी चितारलेल्या चित्रांमुळे अहमदनगर वासियांना एका भिंतीवर ‘नगर दर्शन’ होणार आहे.
तिघा चित्रकारांनी चितारले नगर दर्शन विठ्ठल पुरी, देविदास जगधने आणि बाळासाहेब गायकवाड हे तिघे सर्वसामान्य कुटुंबातील चित्रकार आहेत. या तिघांनी नगरचं सौंदर्य आपल्या कलेतून साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अनेक वर्षांपासून त्यांची नगरसाठी काहीतरी करण्याची धडपड होती. ती त्यांनी नगरमधील प्रमुख प्रेक्षणीय ठिकाणे एका भिंतीवर चितारून पूर्ण केली आहे. आपले स्वप्न पूर्ण होत असताना त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मोत्यासारखी ज्वारी खरेदी करायचीय? ‘इथं’ संपेल शोध, Video 350 फूट लांब भिंतीवर चितारली 17 स्थळे अहमदनगर जिल्ह्याला भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक अशी सर्वच अंगांनी उल्लेखनीय पार्श्वभूमी आहे. हेच दाखवण्याचं काम एका भिंतीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 350 फूट लांब असणाऱ्या भिंतीवरती नगर जिल्ह्यातील महत्त्वाची प्रेक्षणीय धार्मिक स्थळे रेखाटण्यात आली आहेत. एकूण 17 स्थळे या ठिकाणी रेखाटण्यात आली आहेत. अत्यंत सुबक अशा कलाकृती आणि हुबेहूब चित्र या ठिकाणी पाहायला मिळतात. ‘होय, आम्ही चोऱ्या करतो!’ आजही या पद्धतीनं ओळख करुन देणारा समाज माहिती आहे? Video ग्रामदैवत श्री विशाल गणपती पासून सुरुवात या चित्र मालिकेची सुरुवात ग्रामदैवत श्री विशाल गणपती पासून करण्यात आली आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांचे आपेगाव, श्री स्वामी समर्थ मंदिर, शनिशिंगणापूर, शिर्डी, कानिफनाथ गड, मोहटा देवी मंदिर, के के रेंज, चांदबीबी महाल, मेहेर बाबा, भुईकोट किल्ला, चर्च, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चौंडी ही नगर जिल्हयातील काही महत्वाची स्थळे आहेत. काळ्या ऊसाचाही शेतकऱ्यांना उपयोग, पाहा काय आहे आरोग्याला फायदा! Video काही चित्रे 3D मध्ये चितारली एका भिंतीवर 17 चित्रे रेखाटण्यासाठी तब्बल एक महिना कालावधी लागला. तिघा चित्रकारांनी आपापली कामे विभागून घेतली आहेत. याच कामाचा मोठा अनुभव असल्यामुळे अत्यंत सुबक असे चित्र या चित्रकारांनी रेखाटले. मंदिरांची सुंदर व हुबेहुब कलाकृती रेखाटल्या आहेत. तर काही चित्रे ही 3D मध्ये तयार केली आहेत. त्यासाठी रंगही आकर्षक वापरण्यात आले आहेत. त्यामुळे या चित्रांचे फोटो अत्यंत सुंदर येत आहेत. रोजच्या जेवणात येईल खास चव, पाहा फेमस शिपी आमटीचा Recipe Video कुठे आहे ही भिंत? अहमदनगरहून संभाजीनगरला जाणाऱ्या महामार्गावर मोठी वर्दळ असते. या मार्गावरच ही भिंत आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना अहमदनगरचा चालता बोलता सांस्कृतिक इतिहास पाहता येणार आहे.