जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ahmednagar News : मोत्यासारखी ज्वारी खरेदी करायचीय? 'इथं' संपेल शोध, Video

Ahmednagar News : मोत्यासारखी ज्वारी खरेदी करायचीय? 'इथं' संपेल शोध, Video

Ahmednagar News : मोत्यासारखी ज्वारी खरेदी करायचीय? 'इथं' संपेल शोध, Video

जामखेडची मोत्यासारखी पांढरीशुभ्र ज्वारी प्रसिद्ध आहे. ज्वारीचा कडबा पशुखाद्य म्हणून दर्जेदार समजला जातो.

  • -MIN READ Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

    प्रियांका बोबडे, प्रतिनिधी अहमदनगर, 14 फेब्रुवारी: महाराष्ट्रातील बहुतांश भागाच्या खाद्य संस्कृतीत ज्वारी हा महत्त्वाचा घटक आहे. रोजच्या आहारात बहुंताश लोक ज्वारीच खातात. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बार्शीची ज्वारी प्रसिद्ध आहे. तशीच अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुकाही मोत्यासारख्या पांढऱ्या शुभ्र ज्वारीसाठी ओळखला जातो. येथील ज्वारीला राज्यात आणि परराज्यातही मागणी आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    जामखेड ज्वारीचा ब्रॅण्ड जामखेड तसा कोरडवाहू तालुका आहे. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. तालुक्यात ज्वारी पिकास हवामान अनुकूल असल्याने उत्तम दर्जाची ज्वारी पिकते. 36तालुक्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टपोरे दाणे आणि चवदार असणाऱ्या या ज्वारीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे जामखेडची ज्वारी म्हणजे एक प्रकारचा ज्वारीमधील ब्रॅण्ड आहे. ‘होय, आम्ही चोऱ्या करतो!’ आजही या पद्धतीनं ओळख करुन देणारा समाज माहिती आहे? Video तर उत्पादन वाढते ज्वारीचे उत्पादकता वाढण्यासाठी पेरणीपूर्वी ज्वारीच्या बियांना बीज प्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे खोडकिडा पडत नाही. ज्वारी डोबणे किंवा पेरणी केल्यास ज्वारीचे पीक अतिशय जोमदार येऊन उत्पादकता वाढते. अशा ज्वारीला या भागात वातावरण पोषक असल्याने, अतिरिक्त खताची गरज भासत नाही. संपूर्ण ज्वारी ही पावसावर अवलंबवून आहे. तर काही भागांत तळे व विहिरीवर शेती केली जाते. जालन्याच्या शेतकऱ्याची कमाल! पपई लागवडीतून केली लाखोंची कमाई, पाहा Video ज्वारी काढणीसाठी यंत्रांचा वापर ज्वारी पेरणी केली जाते, ज्वारी काढणीसाठी काही खास पद्धती असतात. या भागात ज्वारी काढतांना पारंपरिक लोकगीत गायली जातात. पूर्वीच्या काळी ज्वारी काढणी, मळणी यासाठी काही दिवस लागायचे. आता येथील शेती यांत्रिक झाली असून ज्वारी यंत्राद्वारेच काढली जाते. Beed: पांढऱ्या तुरीला परराज्यातून मागणी, चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश, Video पशुखाद्य म्हणून कडब्याला मागणी जामखेडच्या ज्वारीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच कडब्यालाही पशुखाद्य म्हणून मागणी आहे. जामखेडच्या ज्वारीचा कडबा पशुखाद्य दर्जेदार समजला जातो. त्यामुळे जामखेडहून मोठ्या प्रमाणात कडब्याची निर्यात केली जाते. काळ्या मसाल्याचे ‘सम्राट’, 45 वर्षांपासून नगरकरांना करत आहेत तृप्त, Video परंपरागत वाणांची जोपासणा शेती क्षेत्र आधुनिक झालं तरी ही या भागात ज्वारीचे परंपरागत स्थानिक वाण शेतकऱ्यांनी जपले आहेत. त्यामध्ये मालदांडी, ज्यूट, बेद्र, दगडी या जातीच्या वाणांची पेरणी बहुतांश शेतकरी करताना दिसतात. दरम्यान, अलिकडच्या काळात फुले यशोधा, वसुधा, माऊली, चित्रा, सिलेक्शन- ३, सुचित्रा, रेवती, परभणी मोती, ज्योती, सुपर मोती असे अनेक ज्वारीचे वाण निघाले. मात्र परंपरागत वाण जपत जामखेडच्या ज्वारीने आपले वैशिष्ट्य जपले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात