मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed : पांढऱ्या तुरीला परराज्यातून मागणी, चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश, Video

Beed : पांढऱ्या तुरीला परराज्यातून मागणी, चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश, Video

X
बीडमधील

बीडमधील पांढऱ्या तुरीला छत्तीसगडमधून मागणी आहे. परराज्यात बाजारपेठ मिळाल्याने शेतकरी फायद्यात आहेत.

बीडमधील पांढऱ्या तुरीला छत्तीसगडमधून मागणी आहे. परराज्यात बाजारपेठ मिळाल्याने शेतकरी फायद्यात आहेत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Bid (Beed), India

  रोहित देशपांडे, प्रतिनिधी

  बीड, 9 फेब्रुवारी: जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड करत असतो. मात्र तुरीला मिळणाऱ्या कमी दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. गतवर्षी बीडमधील पांढऱ्या तुरीला चांगला दर मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली. आता पांढऱ्या तुरीला परराज्यातून मागणी वाढली आहे. त्यामुळे चांगला दर मिळत असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

  यंदा छत्तीसगडमधून मागणी

  गेल्या वर्षी बीडमधील पांढऱ्या तुरीला गुजरातमधील सुरत, बडोदा, अहमदाबाद या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात मागणी होती. यंदा बाजार समितीमध्ये तुरीची आवक सुरू झाल्यानंतर परराज्यातून मागणी वाढत आहे. विशेषत: छत्तीसगडमधून अधिकची मागणी आली आहे. त्यामुळे पांढऱ्या तुरीला 5 ते 7 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. आतापर्यंत जवळपास 3 हजार क्विंटल तूर छत्तीसगड राज्यात पोहोचली आहे.

  Photos : दुष्काळी भागात मिरचीचं मॅजिक, सव्वा एकरातच शेतकरी झाला लखपती

  बाजार समितीत तुरीची आवक

  बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पांढऱ्या तुरीची आवक सूरू झाली आहे. मागील दीड महिन्यांपासून 6 हजार क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक झाली आहे. मागील दोन आठवड्यात तीन ते चार हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे. बीडमध्ये थंडी आणि धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनाला फटका बसला होता. परंतु, आता ही आवक सुरळीत झाली असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे.

  Beed District Bank : बीड जिल्हा बँकेचा अजब कारभार, शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये काढण्याची मुभा

  शेतकऱ्यांना फायदा

  तूर उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच फटका बसतो. त्यात दर चांगला मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक डोलारा ढासळतो. परंतु, आता तुरीला परराज्यातून मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला दर मिळत असून आर्थिक फायदा होत आहे.

  First published:

  Tags: Agriculture, Beed, Beed news, Farmer, Local18