मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'रामदेव बाबाच्या नादी लागू नका' अजितदादांनी डोक्यावर केसं गेल्याचं सभेतच दाखवलं, VIDEO

'रामदेव बाबाच्या नादी लागू नका' अजितदादांनी डोक्यावर केसं गेल्याचं सभेतच दाखवलं, VIDEO

माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही सगळे नखाला नखं घासता का, अशी नखावर नखं घासली की, डोक्यावर केसावर केसं येतात. पण

माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही सगळे नखाला नखं घासता का, अशी नखावर नखं घासली की, डोक्यावर केसावर केसं येतात. पण

माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही सगळे नखाला नखं घासता का, अशी नखावर नखं घासली की, डोक्यावर केसावर केसं येतात. पण

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagardeole, India

कर्जत, 06 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या सडेतोड भाषणामुळे कायम चर्चेत असतात. आज कर्जतमध्ये झालेल्या जाहीर सभेत 'साधू संतांचे ऐका पण बुवाबाजीच्या माग लागू नका, माझ्या डोक्यावरच केस गेले आहे' असं म्हणत डोकच पुढे करून दाखवलं.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या रोहित पवारांच्या मतदारसंघात अंबालिका कारखान्यावर शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी बुवाबाजीच्या नांदाला लागू नका असा सल्ला अजितदादांनी दिला.

माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही सगळे नखाला नखं घासता का, अशी नखावर नखं घासली की, डोक्यावर केसावर केसं येतात. पण केसं यायचं तर बाजूला राहिलं, काही खरं नाही, असं म्हणत अजितदादांनी आपल्या डोक्यावर केसं नाही, असं दाखवण्यासाठी डोकच पुढे केलं होतं.

(शिवसेनेच्या आठवणीने शिंदे गटाचे खास मंत्री भावुक, दिली भावनिक साद)

बुवा लोकांचं काही ऐकू नका, साधू संतांचे ऐका, महापुरुषांचा ऐका. अहिल्याबाई होळकर यांचं ऐका, शाहु-फुले-आंबेडकर असतील. मौलाना आझाद असतील त्यांचं ऐका. या सगळ्या महान व्यक्तींचं ऐका, पण, बुवाबाजीचं काही ऐकू नका.

(जात देवाची नाही तर पंडितांची निर्मिती; त्याच्यासाठी आपण.., भागवत पुन्हा चर्चेत)

नखाला नखं घासू नका, काही तरी तिसरच व्हायचं, डॉक्टरकडे गेल्यावर ते सुद्धा म्हणतील तुम्हाला कुणी करायला सांगितलं, त्यामुळे बुवाबाजीचं ऐकू नका, असा सल्ला अजितदादांनी देताच मेळाव्यात एकच हश्शा पिकला.

First published: