मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जात देवाची नाही तर पंडितांची निर्मिती; त्याच्यासाठी आपण..., मोहन भागवत पुन्हा चर्चेत!

जात देवाची नाही तर पंडितांची निर्मिती; त्याच्यासाठी आपण..., मोहन भागवत पुन्हा चर्चेत!

मोहन भागवत

मोहन भागवत

जाती देवांनी बनवलेल्या नाहीत, तर जाती या पंडितांनी बनवल्या आहेत, असं विधान आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 फेब्रुवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'जाती देवांनी बनवलेल्या नाहीत, तर जाती या पंडितांनी बनवल्या आहेत. देवासाठी आपण सर्वजन एक आहोत,' असं वक्तव्य आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे. ते मुंबईत संत शिरोमणी रोहिदास जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. याबाबत एका वृत्तपत्राने वृत्त दिलं आहे.

नेमकं काय म्हटलं भागवत यांनी?

'जाती देवांनी बनवलेल्या नाहीत, तर जाती या पंडितांनी बनवल्या आहेत. देवासाठी आपण सर्वजन एक आहोत. आपल्या देशाला वाटून पहिल्यांदा आक्रमण झाली, त्यानंतर परकीय लोकांनी याचा फायदा घेतल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. तसेच समाजामध्ये फूट पाडून लोकांनी त्याचा नेहमीच फायदा घेतला आहे. भारतावर परकीय आक्रमणं झाली, समाजामध्ये फूट पाडण्यात आली आणि त्याचा फायदा परकीय लोकांनी घेतला. समाजातील आपुलकी संपली की स्वार्थ आपोआप मोठ होतो, असंही यावेळी भागवत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : थोरात, पटोलेंमध्ये खरच वाद आहे? अशोक चव्हाणांनी सांगितली 'अंदर की बात'

प्रत्येक काम समाजासाठी

पुढे बोलताना भागवत यांनी म्हटलं आहे की, हिंदू समाज नष्ट होणार आहे का? हे तुम्हाला कोणताही ब्राह्माण सांगू शकत नाही. आपली उपजिवीका म्हणजे समाजाप्रतिची जबाबदारी आहे. प्रत्येक काम हे समाजासाठी केलं जातं. मग कोणी उच्च, निच, लहान, मोठं कसं होऊ शकतं? असा सवाल मोहन भागवत यांनी केला आहे.

First published: