अहमदनगर, 17 ऑगस्ट : कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दहीहंडी उत्सव स्वागत कमान उभारण्यात येत आहे. यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध दर्शविला. (Ahmednagar Crime) दरम्यान काल (दि.17) मंगळवारी दिवसभर दोन्ही गट आमने-सामने आले. रात्रीच्या सुमारास भाजप आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामूळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अश्या घोषणा दिल्या. तर भाजप कार्यकर्त्यांनी विवेक कोल्हे व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाला होता. मात्र कोपरगाव शहर पोलीस व शीघ्र कृती दलाचे जवान वेळीच पोहचले व जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. जमावाला पांगवण्यासाठी पळताना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पडून किरकोळ जखमी झाले.
हे ही वाचा : पुणे-नगर महामार्गावर कंटेनरची व्हॅनला धडक, 3 मुलांसह एकाच कुटुंबातील 5 जण ठार
दरम्यान ज्या स्वागत कमानीवरून वाद सुरू झाला ती कमान पोलिसांनी लगेचच हटवली आहे. प्रशासनाला जर कमान हटवायची होती तर मग दिवसभर वाट का पाहिली असा देखील प्रश्न यामध्ये निर्माण होतोय.
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला अटक होणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खूप मोठी खळबळ उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप बडा नेता जेलमध्ये जाणार आहे, असं मोहित कंबोज त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
हे ही वाचा : संजय राठोडांकडे सामाजिक न्याय विभाग, अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांची सेनच्या मंत्र्याना मोठी जबाबदारी
भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांच्या ट्विटचा आजपर्यंत इतिहास आहे. त्यांनी केलेल्या आरोपांनंतर राज्यात तशा हालचाली घडल्या आहेत. त्यांनी आरोप केल्यानंतर राजकीय नेत्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. विशष म्हणजे मोहित यांचं हे ट्विट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दबाव तंत्र म्हणून आहे की त्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे? असा सवाल उपस्थित होतोय.