जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संजय राठोडांकडे सामाजिक न्याय विभाग, अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांची सेनच्या मंत्र्याना मोठी जबाबदारी

संजय राठोडांकडे सामाजिक न्याय विभाग, अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांची सेनच्या मंत्र्याना मोठी जबाबदारी

संजय राठोडांकडे सामाजिक न्याय विभाग, अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांची सेनच्या मंत्र्याना मोठी जबाबदारी

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकारचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) 17 ऑगस्टपासून मुंबईमध्ये सुरू होत आहे, त्याआधी शिंदेंनी संजय राठोड यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 ऑगस्ट : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकारचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) 17 ऑगस्टपासून मुंबईमध्ये सुरू होत आहे. राज्यामध्ये सत्तानाट्य घडल्यानंतर हे पहिलंच मोठं अधिवेशन होत आहे, त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार हे निश्चित आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. विधिमंडळ कामकाजावेळी या मंत्र्यांना त्यांच्या खात्याशिवाय या खात्यांचं कामकाजही पाहावं लागणार आहे. संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन आहे, पण पावसाळी अधिवेशनात ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचं काम पाहतील. याशिवाय उदय सामंत यांना माहिती व तंत्रज्ञान, शंभुराज देसाई यांना परिवहन, दादा भुसे यांना पणन, तानाजी सावंत यांना मृदु व जलसंधारण, अब्दुल सत्तार यांना मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, दीपक केसरकर यांना पर्यावरण व वातावरणीय बदल, संदीपान भुमरे यांना अल्पसंख्याक व औकाफ या विभागांची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

News18

30 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, यानंतर 39 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यामध्ये शिवसेनेचे 9 आणि भाजपच्या 9 अशा एकूण 18 मंत्र्यांच्या शपथविधी झाला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर 14 ऑगस्टला खातेवाटप जाहीर करण्यात आलं. या खातेवाटपानंतर शिवसेनेचे मंत्री नाराज झाल्याची चर्चा झाली, पण या मंत्र्यांनी ही चर्चा फेटाळून लावत आम्ही नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. कोणत्या मंत्र्यांकडे कोणती खाती? 1) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास 2) सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय 3) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य 4) डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास 5) गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 6) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता 7) दादा भुसे- बंदरे व खनिकर्म 8) संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन 9) सुरेश खाडे - कामगार 10) संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन 11) उदय सामंत - उद्योग 12) प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण 13) रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 14) अब्दुल सत्तार - कृषी 15) दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा 16) अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण 17) शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क 18) मंगलप्रभात लोढा - पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात