शिरुर, 17 ऑगस्ट : पुणे (pune) जिल्ह्यातील पुणे-नगर महामार्गावर (Pune-Nagar Highway) रांजणगाव येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव इथं एलजी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. मस्के कुटुंबीय हे एका स्कुल व्हॅनने जात होते. त्यावेळी उलट दिशेनं आलेल्या कंटेनरने व्हॅनला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये व्हॅनचा चुराड झाला आहे. या अपघातात 5 जण ठार झाले आहे तर 1 जण जखमी झाला आहे. सर्व जण एकाच कुटुंबातले होते. अहमदनगर येथील आवाने बुद्रुक येथील रहिवासी आहेत. संजय म्हस्के (वय ५३) रामा मस्के (वय ४५) राजु मस्के( ०७) हर्षदा मस्के (०४) विशाल मस्के (१६) अशी मृतांची नाव आहे. तर साधना मस्के या जखमी आहे. त्यांना तातडीन नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 2 ठार दरम्यानस पुणे मुंबई लेन,एक्स्प्रेस वेवर कळंबोली ब्रिजवर भरधाव कारवरील चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. या अपघातात कारमधील दोघा जणांचा मृत्यू तर कारचालक जखमी झाला आहे. कारचालक याच्याविरोधात खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती मुंबई अंधेरी येथील असून गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून ते परत येत असताना पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेने कारने घरी जात होते. यावेळी पुणे मुंबई लेन, एक्स्प्रेस वेवर कळंबोली ब्रिजवर जयंत डांगे याचे कारवरील नियंत्रण सुटले अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर होवून पूर्णपणे नुकसान झालेले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.