मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रात्र अपुरी ठरली, 5 वर्षांचा सागर नाही वाचला, 15 फूट खोल बोअरवेलमध्ये सोडला जीव

रात्र अपुरी ठरली, 5 वर्षांचा सागर नाही वाचला, 15 फूट खोल बोअरवेलमध्ये सोडला जीव

दोन्ही बाजूने खोदकाम करण्यात आले. तब्बल 8 तास हे काम सुरू होते.

दोन्ही बाजूने खोदकाम करण्यात आले. तब्बल 8 तास हे काम सुरू होते.

शेतातील बोरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा पडल्याची घटना

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagardeole, India

कर्जत, 14 मार्च : खेळता खेळता एक पाच वर्षांचा मुलगा अचानक बोअरवेलमध्ये पडला, घटनेची माहिती मिळताच रात्रभर त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले पण मदत अपुरी ठरली. अवघ्या 5 वर्षांच्या सागरने बोअरवेलमध्येच प्राण सोडले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे शेतातील बोरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली होती. सागर बुधा बरेला असं या चिमुकल्याचं नाव होतं. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ बोअरवेल जवळ एकत्र झाले आहेत. पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी पोहोचले आणि मुलाला काढण्यासाठी प्रयत्न करत होते.

(मोबाईलचं साहित्य आणायला गेले अन् वाटेत मृत्यूने गाठलं, 2 भावांसह चौघांनी जागेवरच सोडला जीव)

मध्य प्रदेशच्या बुऱ्हानपूर जिल्ह्यातील ऊसतोड मजूर कर्जत तालुक्यातील अंबालिका शुगर कारखान्यात ऊस तोडणीसाठी आलेले होते. यातील बुधाजी बारेला या ऊसतोड मजुराचा हा पाच वर्षाचा सागर नावाचा मुलगा होता. घटनास्थळी एनडीआरएफच्या पाच पथकाकडून बचावकार्य सुरू होते. पहाटे 2 वाजेपर्यंत बचावकार्य सुरू होते.

 (... तर तुम्ही एक रुपयाही न देता पार करु शकता टोल प्लाजा, काय आहेत नियम?)

बोरवेलच्या 15 फूट खोलीवरती हा मुलगा असल्याचे जाणवत होते, त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू केले होते. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दोन्ही बाजूने खोदकाम करण्यात आले. तब्बल 8 तास हे काम सुरू होते.  मात्र त्याला वाचवण्यासाठी प्रशासला अपयश आले. 5 वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos