मुंबई : रस्त्याने तुम्ही लांबवरचा प्रवास केलात, तर तुम्हाला त्याचा टोल द्यावा लागतो. तुम्ही जागोजागी टोलनाका असल्याचे पाहिले असेल. यथे बऱ्याचदा लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. टोल प्लाझावर जास्त वेळ वाया जाऊ नये आणि लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वेळोवेळी नियम बनवत असते. यामुळेच FASTag अनिवार्य करण्यात आले आहे.
प्रत्येकाला टोलनाक्यावरती टोल भरावा लगतो. लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे शासनाच्या वतीने टोल प्लाझा चालकांना स्पष्टपणे सूचित करण्यात आले आहे. यासाठी टोल प्लाझावरील अधिकाऱ्यांपासून ठेकेदारांपर्यंत प्रत्येक वाहनाने कोणताही त्रास न होता टोल प्लाझा ओलांडला पाहिजे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य की अयोग्य?
टोलनाक्यावरील वाहनांच्या रांगा नियंत्रित करण्यासाठी आणि टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना चपळ ठेवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काही नियम केले आहेत. तुम्हाला माहिती आहे का की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरून प्रवास करताना कोणत्याही टोल प्लाझावर वाहनाला 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबू देऊ नये असे आदेश दिले आहेत. हा आदेश पीक अवर्समध्ये देखील लागू होतो.
या अशाप्रकारच्या नियमांबद्दल आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ठावूक नाहीय. ज्यामुळे आपण सर्वच लोक रांगेत तासनतास उभे राहातो आणि टोल भरुन पुढे जातो. पण तुम्हाला माहितीय का? की सरकारने टोलनाक्यांसंबंधीत असे काही नियम बनवले आहेत, ज्या अंतर्गत तुम्हाला टोलनाक्यावर पैसे भरावे लागणार नाही.
चला याबद्दल सविस्तर जाणू घेऊ
सरकारने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना १०० मीटरपेक्षा जास्त लांबीची लाईन लागू देऊ नये असे आदेश दिले आहेत आणि असे झाले तर जोपर्यंत ही लाईन 100 मीटरपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत त्या लाईनच्या आतील सर्व वाहनांना न थांबता टोलनाका पास करण्याची मुभा सरकारने दिली आहे.
प्रत्येक महामार्गाच्या टोलनाक्यावर अशाप्रकारे टोलपासून १०० मीटरचे अंतर चिन्हांकित करण्यासाठी पिवळी रेषा करावी, असे आदेश सरकारने दिले आहेत.
तसेच टोल प्लाझा चालकाने गाड्यांची लाईन ताबडतोब ती खाली करण्याची कार्यवाही करावी, असा स्पष्ट आदेश आहे. फेब्रुवारी 2021 पासून टोलनाक्यांवर 100 टक्के कॅशलेस व्यवहार लागू करण्यात आले आहेत. त्यात ९६ टक्के टोल प्लाझावर फास्टॅगचा वापर केला जात आहे.
ऑर्डर केव्हा देण्यात आली
26 मे 2021 च्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आदेशात असेही म्हटले आहे की, टोल प्लाझावर 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ कोणत्याही टोलवर वाहनाला लागू नये याची काळजी घ्यावी लागेल. तसे न केल्यास वाहनचालक टोल न भरताही वाहन घेऊन जाऊ शकतात, असं ही म्हटलं जातं.
तुम्ही येथे क्लिक करुन सरकारी पत्रात काय लिहिलंय याची माहिती सविस्तर वाचू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.