जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोबाईलचं साहित्य आणायला गेले अन् वाटेत मृत्यूने गाठलं, 2 भावांसह चौघांनी जागेवरच सोडला जीव

मोबाईलचं साहित्य आणायला गेले अन् वाटेत मृत्यूने गाठलं, 2 भावांसह चौघांनी जागेवरच सोडला जीव

हा अपघात इतका भीषण होता की, मारूती अल्टो कारचा चुराडा झाला

हा अपघात इतका भीषण होता की, मारूती अल्टो कारचा चुराडा झाला

गणेश निरडी आणि आदित्य निरडी हे दोघे भाऊ आपल्या मोबाईल शॉपीच्या साहित्य खरेदीसाठी हैदराबादला अल्टो कारने निघाले होते.

  • -MIN READ Nanded,Maharashtra
  • Last Updated :

मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड, 13 मार्च : मोबाईलचे साहित्य आणण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तेलंगणामध्ये घडली आहे. तेलंगणामध्ये गेलेल्या दोन सख्या भावांसह कार अपघातात चार जण ठार झाले आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यात पहाटे निझामाबाद जवळच्या इंद्रायनापल्ली जवळ हा अपघात झाला. नांदेड जिल्ह्यातील बीलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील गणेश निरडी आणि आदित्य निरडी हे दोघे भाऊ आपल्या मोबाईल शॉपीच्या साहित्य खरेदीसाठी हैदराबादला अल्टो कारने निघाले होते. त्यांचा सोबत कुंडलवाडी येथील मित्र प्रकाश अंकलकर आणि निझामाबाद येथील साईनाथ भोळे हे दोघे होते. सर्व जण हे मारूती अल्टो कारने चालले होते. निजामाबाद जिल्ह्यातील इंदलवाई मंडल इथं राष्ट्रीय महामार्ग 44 वर मध्यरात्री अचानक एक कंटेनर समोरच्या बाजूने आला. त्यामुळे कार कंटेनरवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, मारूती अल्टो कारचा चुराडा झाला. त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. कारची अवस्था इतकी भीषण होती की, चौघांचे मृतदेह हे कारचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले होते. (… तर तुम्ही एक रुपयाही न देता पार करु शकता टोल प्लाजा, काय आहेत नियम?) या अपघातात गणेश हानमंलू निरडी (वय २९), आदित्य हानमंलू निरडी (वय २७) प्रकाश सायलू अक्लंवार (२९) वर्षे यांचा मृत्यू झाला. यात एका मुलाची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी निजामाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या झालेल्या दुखःद घटनेमुळे कुंडलवाडी शहरात व परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.  एसटीच्या धडकेत बोदवडचे दुचाकीवरील 3 तरुण ठार दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील वरणगावमध्ये भरधाव एस.टी.बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोदवड तालुक्यातील मनुर गावातील तिघे युवक ठार झाले. हा अपघात सोमवारी सकाळी घडला. या अपघाताने बोदवड तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तिघे युवक लग्नासाठी दुचाकीने जात असताना समोरून येणार्‍या बसने जोरदार धडक दिली. ( सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य की अयोग्य? ) धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीचा चक्काचूर होवून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. तर बसच्या चालक बाजूचे मोठे नुकसान झाले. बसच्या धडकेने तिघे युवक रस्त्यावर फेकले गेल्याने डोक्याला मार लागल्याने तसेच रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: nanded
  • First Published :
जाहिरात
जाहिरात