Home /News /maharashtra /

अहमदनगर: मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेले तरुण परतलेच नाही, तलावात आढळले 2 सख्ख्या भावांचे मृतदेह

अहमदनगर: मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेले तरुण परतलेच नाही, तलावात आढळले 2 सख्ख्या भावांचे मृतदेह

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील दोन सख्ख्या भावांचा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला (2 Brothers Drown in Lake).

अहमदनगर 05 जुलै : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील दोन सख्ख्या भावांचा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला (2 Brothers Drown in Lake). या घटनेमुळे करंजी गाववर मोठी शोककळा पसरली आहे. संदीप दत्तात्रय अकोलकर वय वर्ष २८ आणि बाप्पू दत्तात्रय अकोलकर वय वर्षे २२ अशी घटनेत मृत्यू झालेल्या दोन सख्ख्या भावांची नावं आहेत. सोमवारी सकाळी करंजी येथील मुखेकरवस्ती जवळील बोरुडेचा पाझर तलाव या ठिकाणी दोघंही मेंढ्यांना धुण्यासाठी गेले होते, यावेळी ही घटना घडली. थरारनाट्य! अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न, मग खंडणीची मागणी; पोलिसांच्या एन्ट्रीनंतर पुढे काय झालं? तलावाजवळ गेले असता यातील एकाचा मेंढीला धुवत असताना एक भाऊ पाय घसरल्याने डोहात पडला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा भाऊदेखील मदतीला धावला. दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आणि दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून दुर्देव मृत्यू झाला. काहीवेळाने मेंढ्या तिथे दिसत आहेत परंतु त्यासोबतचे दोन तरुण कुठे आहेत याबाबत आजूबाजूच्या लोकांची चर्चा सुरू झाली. काही वेळानंतर काही शेतकऱ्यांनी त्या डोहाजवळ येऊन पाहिले असता हे दोघंही पाण्यातच बुडाले असल्याचा अंदाज उपस्थितांना आला. यानंतर आजूबाजूच्या तरुणांनी तात्काळ त्या पाण्याच्या डोहात उड्या घेतल्या आणि या दोघांना अर्ध्या तासानंतर बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे करंजी गाववर मोठी शोककळा पसरली आहे. तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या गोळ्या! पाथर्डी येथे शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी उशिरा या दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप अकोलकर याला एक चार वर्षाचा मुलगा असून बापू मात्र अविवाहित आहे. दोन्ही तरुण अतिशय गरीब कुटुंबातील होते आणि दोघेही खूप कष्टाळू होते. या दोन्ही तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे करंजीसह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Ahmednagar, Shocking news

पुढील बातम्या