जाहिरात
मराठी बातम्या / देश / तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या गोळ्या!

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या गोळ्या!

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या गोळ्या!

लंडोरा गावातील कशमीर सिंह आणि सिम्रनजीत सिंह या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून मैत्री होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula Haryana) येथे दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणाने वेगळेच वळण घेतले. (Firing on friend) तसेच या भांडणाचे कारणही तितकेच रंजक आहे. नेमकं काय आहे प्रकरण -  वर्षानुवर्षे जिवलग असलेल्या या दोन तरुणांच्या मैत्रीचे रुपांतर द्वेषात आणि शत्रुत्वात झाले जेव्हा एक मुलगी दोघांमध्ये आली. तरुणीसोबतच्या मैत्रीवरून दोघांमध्ये वाद झाला. नंतर हा वाद इतका वाढला की, मित्राने आपल्या जिवलग मित्रावर गोळीबार केला. गोळीबारात मित्राच्या पायात 2 गोळ्या लागल्या. मात्र सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यासाठी पथके तयार केली आहेत. लंडोरा गावातील कशमीर सिंह आणि सिम्रनजीत सिंह या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र, पंचकुलाहून परतत असताना एका मुलीवरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. यानंतर कशमीर सिंह ने त्याचा मित्र सिम्रनजीत सिंह याच्यावर एक, दोन नाही तर चार गोळ्या झाडल्या. सिमरनजीत सिंगच्या पायात 2 गोळ्या लागल्या. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याचा जीव धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे. तर या घटनेनंतर कश्मीर सिंह घटनास्थळावरुन फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. सीन ऑफ क्राइम टीमला बोलवून फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 307 आणि आर्म्स अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हेही वाचा -  वाहतूक पोलिसाने दुचाकी थांबवल्याचा राग, भररस्त्यात होमगार्डची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण छप्पर पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश चंद्र यांनी सांगितले की, तरुणीला मेसेज केल्याने हा वाद झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. सध्या तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. जखमी सिमरनजीत सिंग याची प्रकृती सध्या स्थिर आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात