मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

डॉक्टरची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण

डॉक्टरची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण

कर्जत तालुक्यातील (Karjat) राशीन याठिकाणाहून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलाचे आजारपण सहन होत नसल्याने एका नामवंत डॉक्टरने त्याची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना राशीनमध्ये घडली आहे.

अहमदनगर, 20 फेब्रुवारी: कर्जत तालुक्यातील (Karjat) राशीन याठिकाणाहून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलाचे आजारपण सहन होत नसल्याने एका नामवंत डॉक्टरने त्याची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याची घटना राशीनमध्ये घडली आहे. डॉ. थोरात यांनी पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या (Doctor Family Committed Suicide) केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. संपूर्ण तालुक्यात ओळख असणाऱ्या या डॉक्टरांनी असे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे. गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान ज्या खोलीत त्यांचे मृतदेह आढळले त्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी चिठ्ठी देखील लावली होती. त्या चिठ्ठीत डॉक्टरांनी असे लिहिले आहे की, 'माझा थोरला मुलगा (18) कृष्णा याला ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराधासारखे वाटत आहे. अनेक दिवसापासून आम्ही यामुळे व्यथित होतो.'

त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, 'कृष्णाचेही कशात मन लागत नाही. हे दु:ख आम्ही आई-वडील म्हणून सहन करू शकत नाही. त्यामुळे मी आणि माझी पत्नी वर्षा वय (39) आत्महत्येसारखे कृत्य करत आहोत.  हे योग्य नसेल तरी नाईलाजावास्तव हे कृत्य करीत आहोत. त्यात कुणालाही जबाबदार धरू नये.'

(हे वाचा-मनोरंजन विश्वात आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एका TV अभिनेत्याने संपवलं जीवन)

(हे वाचा-पुणे हादरलं! गुंडांच्या टोळक्याचा तरुणावर तलवार-कोयत्याने जीवघेणा हल्ला)

दरम्यान एका प्रतिष्ठित डॉक्टर कुटुंबांने असे पाऊल उचलल्याने अनेकांच्या मनात संशय देखील निर्माण झाला आहे. मुलाला ऐकू येत नसल्यामुळे डॉक्टर कुटुंबाने आत्महत्या केली, असे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणात आता ही आत्महत्या आहे की घातपात याचा कसून तपास करत आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Doctor family suicode, Maharashtra, Shocking news, Suicide, महाराष्ट्र