मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

धक्कादायक! मनोरंजन विश्वात आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एका TV अभिनेत्याने संपवलं जीवन

धक्कादायक! मनोरंजन विश्वात आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एका TV अभिनेत्याने संपवलं जीवन

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. तमिळ अभिनेता इंद्रकुमार याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्येचं पाऊल उचललं आहे

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. तमिळ अभिनेता इंद्रकुमार याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्येचं पाऊल उचललं आहे

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. तमिळ अभिनेता इंद्रकुमार याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्येचं पाऊल उचललं आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 20 फेब्रुवारी: अगदी काही दिवसांपूर्वीच अभिनेता संदीप नाहर (Sandeep Nahar Committed Suicide) च्या आत्महत्येमुळे मनोरंजन विश्व हादरलं होतं. 2020 वर्षामध्ये मनोरंजन विश्वाने अनेक तारे गमावले. आज पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेता इंद्रकुमार याने (Tamil Actor Indrakumar Committed Suicide) टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि एक अपत्य असा परिवार आहे. पिंकविलाने इंद्रकुमारच्या आत्महत्येबाबत वृत्त दिले आहे.

19 फेब्रुवारी रोजी पेलांबलूर याठिकाणी ही घटना घडली आहे. मीडिया अहवालानुसार त्याने त्याच्या मित्राच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. याठिकाणी पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही आहे. बुधवारी तो मित्राबरोबर सिनेमा पाहण्यास देखील गेला होता, त्यानंतर परतल्यानंतर तो एका मित्राकडेच होता. मित्रांनाच त्याचा मृतदेह सापडला होता, पोलिसांना देखील त्यांनी माहिती दिली. सदर प्रकरणाचा तपास सुरू असून सुसाइड नोट न सापडल्यामुळे सर्व अँगलनी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

(हे वाचा-मी दीपिका किंवा आलिया नाही,सरळ हाडं तोडते; कंगनाचं काँग्रेस आमदाराला प्रत्युत्तर)

अद्याप इंद्रकुमार याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत ठोस माहिती समोर आली नाही आहे. तो एक स्ट्रगलिंग अॅक्टर होता. अभिनय क्षेत्रात तो स्वत:ची ओळख निर्माण करू पाहत होता. पण तेवढ्यात त्याने असा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. इंद्रकुमार श्रीलंकन रेफ्यूजी होता असून तो एका तमिळ मालिकेचा भाग होता. दरम्यान मीडिया अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की, सिनेमात काम मिळत नसल्याने तो त्रस्त होता. अशी देखील माहिती समोर येते आहे की त्याच्यामध्ये आणि त्याच्या पत्नीमध्ये काही गैरसमज देखील होते.

First published:

Tags: Indrakumar, Shocking news, Suicide, Tamil actor, Tollywood