Home /News /crime /

पुणे हादरलं! गुंडांच्या टोळक्याचा तरुणावर तलवार-कोयत्याने जीवघेणा हल्ला; घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

पुणे हादरलं! गुंडांच्या टोळक्याचा तरुणावर तलवार-कोयत्याने जीवघेणा हल्ला; घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

Crime in Pune: पुणे शहरातील हडपसर भागात एका युवकावर गुंडाच्या काही टोळक्याने (Gang Of Goons) तलवारीने आणि कोयत्याने (Sword and Machete) वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद (CCTV footage) झाला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 20 फेब्रुवारी: पुणे शहरातील हडपसर भागात एका युवकावर गुंडाच्या काही टोळक्याने (Gang Of Goons) तलवारीने आणि कोयत्याने (Sword and Machete) वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद (CCTV footage) झाला आहे. तरुणावर झालेल्या या जीवघेण्या  हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. हा हल्ला का करण्यात आला याची नेमकी माहिती अद्याप मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना पुणे (Pune) शहरातील लोकांनी गजबजलेल्या हडपसर (Hadapsar crime) परिसरात घडली आहे. या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या पीडित तरुणाचं नाव रोहन इंगळे (Rohan Ingale) असून त्याच्यावर शहरातील एका गुंडाच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला आहे. यावेळी रोहण आपला जीव वाचवण्यासाठी जवळच्या एका एटीएममध्ये शिरला होता. परंतु या गुंडाच्या टोळक्याने रोहणला एटीएममधून बाहेर ओढून तलवार आणि कोयत्याने वार केले आहेत. यावेळी तिथे उपस्थित असणारा आणखी एका तरुणाने रोहणला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पण गुंडाच्या टोळक्यातील एका युवकाने त्यालाही तलवारीचा धाक दाखवला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दोन दिवसांपूर्वी 18 फेब्रुवारी रोजी घडलं आहे. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. (हे वाचा- अश्लील VIDEO बनवून महिलेने मागितले 10 लाख; प्रकरण मीडियात नेण्याची दिली धमकी याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच जखमी रोहन इंगळेवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Attack, Crime news, Gang of goons, Gangster, Maharashtra, Pune, Pune gangwar cctv, Video viral

    पुढील बातम्या