नांदेड, 17 नोव्हेंबर: नांदेड जिल्ह्यातील देगलूर याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सासरच्या मंडळींकडून सातत्याने लेकीचा होणारा छळ (Married woman persecution by in law family) बघवल्याने वडिलांनीच आपल्या आयुष्याचा शेवट (Father Commits suicide) केला आहे. वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर जबरदस्त धक्का बसल्याने विवाहित मुलीचाही मृत्यू (Daughter death) झाला आहे. काही तासांच्या अंतराने बापलेकीच्या झालेल्या दुर्दैवी अंतामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही हृदय हेलावणारी घटना देगलूर तालुक्यातील सुगाव येथे घडली आहे. शंकर परशुराम भोसले असं आत्महत्या करणाऱ्या वडिलांचं नाव आहे. तर वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने मृत पावलेल्या मुलीचं नाव माधुरी आहे. देगलूर तालुक्यातील सुगाव येथील रहिवासी असणाऱ्या शंकर भोसले यांची मोठी मुलगी माधुरी हिचा विवाह 12 जुलै 2020 रोजी उंद्री येथील नणंदेचा मुलगा संदीप वडजे (25) याच्याशी झाला होता. लग्नानंतर 15 दिवसापासूनच सासु रावणबाई वडजे, सासरा हनुमंत वडजे आणि नणंद शीला आणि प्रणिता हे सर्वजण माधुरीला विविध कारणातून त्रास देत होते. हेही वाचा- काळिमा! नातवाच्या दफनविधीसाठी गेलेल्या नराधमानं पोटच्या लेकीवरच केला बलात्कार ‘तुला घरातील काम येत नाही, स्वयंपाक करता येत नाही. आम्ही दुसरी मुलगी करणार होतो. तू आम्हाला पसंत नाहीस’ असं म्हणत सासरची मंडळी विवाहितेचा छळ करत होते. अगदी छोट्या छोट्या कारणातून सासरीची मंडळी अमानुष वागणूक देत अपमान करायचे. माधुरी नीट वागत नाहीये, त्यामुळे तिला नांदवू शकत नाही, असं सांगत पती संदीप यानं माधुरीला सुगावला आणून सोडलं. पण जानेवारी 2021 मध्ये जवळच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करत माधुरीला पुन्हा सासरी नेऊन सोडलं. यानंतर पती संदीप माधुरीला घेऊन पुण्याला गेला. हेही वाचा- तिसरी मुलगी झाली म्हणून महिलेचा कुटुंबीयांकडून खून, पतीनेच घातला अखेरचा घाव पण यावेळी सासू आणि दोन्ही नणंदाही त्यांच्यासोबत पुण्याला गेल्या. येथे गेल्यानंतरही विवाहितेला होणारा त्रास कमी झाला नाही. चारचाकी गाडी खरेदी करण्यासाठी आणि पुण्याल प्लॉट घेण्यासाठी माहेरून पाच लाख आणण्यासाठी माधुरीचा छळ केला जाऊ लागला. सासरी मुलीला होणारा त्रास पाहून पित्याने आत्महत्या केली आहे. वडिलांच्या मृत्यूची खबर मिळताच धक्का बसल्याने मुलीचाही अंत झाला आहे. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.