मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तिसरी मुलगी झाली म्हणून महिलेचा कुटुंबीयांकडून खून, पतीनेच घातला अखेरचा घाव

तिसरी मुलगी झाली म्हणून महिलेचा कुटुंबीयांकडून खून, पतीनेच घातला अखेरचा घाव

तीन मुलींना जन्म दिल्याबद्दल (In laws killed married woman after she gave birth to third baby girl) राग मनात धरून पती आणि कुटुंबीयांनी महिलेचा निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

पटना, 16 नोव्हेंबर: तीन मुलींना जन्म दिल्याबद्दल (In laws killed married woman after she gave birth to third baby girl) राग मनात धरून पती आणि कुटुंबीयांनी महिलेचा निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. वंशाला दिवा हवा, या खुळचट समजुतीतून आणि आपली पत्नी सतत मुलींनाच जन्म देत असल्याच्या (Murder for dowry) रागातून सासरच्या मंडळींनी तिचा बळी घेतला. एकीकडे सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या घोषणा देत महिला सबलीकरणाचा नारा देत असताना दुसरीकडे मात्र मुलीला जन्म दिल्याच्या कारणावरून महिलेचा बळी घेण्याची घटना घडली आहे.

हुंड्यासाठी केला छळ

बिहारमधील महेशाडीह या भागात राहणाऱ्या शिवानीचं सुनील दास नावाच्या तरुणासोबत 10 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांना 3 मुली झाल्या. हत्या करण्यापूर्वी काही वर्षं आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ करण्यात येत होता, अशी माहिती मृत तरुणीच्या वडिलांनी दिली आहे. सासरच्या मंडळींनी आपल्याकडे 2 लाख रुपये हुंड्याची मागणी केली होती. पैसे दिले नाहीत, तर मुलीचा छळ करू अशी धमकीदेखील देण्यात आली होती. आपण यापूर्वी जमेल तेवढे पैसे दिले, मात्र त्यापेक्षा जास्त देणं शक्य नसून परिस्थिती गरीबीची असल्याचं त्यांनी मुलीच्या पतीला सांगितलं होतं. त्यानंतर मुलीवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण भयंकर वाढलं.

तिसरी मुलगी झाली म्हणून हत्या

वडील हुंडा देत नाहीत आणि मुलगी सतत मुलींनाच जन्म देते, या कारणावरून घटनेच्या दिवशी सासरच्या मंडळींनी शिवानीला जबर मारहाण करायला सुरुवात केली. मार खाऊन अर्धमेली झालेल्या शिवानीच्या डोक्यात पती सुनीलनं जोरदार वार केला आणि तो वर्मी लागल्यामुळे शिवानीचा मृत्यू झाला.

हे वाचा-किरकोळ कारणातून तरुण बनले राक्षस; खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीला दिला भयंकर मृत्यू

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून सासरच्या मंडळींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पती सुनीलला अटक करण्यात आली असून अधिक तपास सरू आहे.

First published:

Tags: Crime, Murder, Police