भोपाळ, 16 नोव्हेंबर: दोन दिवसांपूर्वी एका जंगलात एका तरुण महिलेचा आणि तिच्या आठ महिन्यांच्या लहान लेकराचा मृतदेह छिन्न विच्छिन्न केलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी संबंधित मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असता, मृत महिलेवर बलात्कार करून तिची हत्या (rape and murder) केल्याचं धक्कादायक माहिती समोर आली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असून नात्याला काळिमा फासणारं सत्य समोर आलं आहे. संबंधित मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार करून तिची हत्या (Father raped daughter and murdered) केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करत नराधम बापाला अटक केली आहे. आरोपी बापानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना मध्य प्रदेशची (Madhya pradesh) राजधानी भोपाळ (Bhopal) येथील समसगडच्या जंगलात (Samasgarh Forest) घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मृत मुलीने एक वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबाचा विरोध डावलून प्रेमविवाह (Murder in love marriage) केला होता. त्यामुळे वडिलांचा आपल्या लेकीवर राग होता. याच रागातून बापानं पोटच्या लेकीसोबत विकृत कृत्य केलं आहे.
हेही वाचा-मेव्हणीवर जीव जडला, प्रेमाखातर पत्नीचा काटा काढला
संबंधित मुलगी लग्न झाल्यापासून आपल्या घरी गेली नव्हती. पण या दिवाळीला ती आपल्या थोरल्या बहिणीकडे गेली. बहिणीकडे आल्यानंतर ऐन दिवाळीत तिच्या आठ महिन्याच्या बाळाचा आजारामुळे मृत्यू झाला. चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानं मृत तरुणीच्या थोरल्या बहिणीनं या घटनेची माहिती आपल्या वडिलांना दिली. त्यामुळे वडिलही रातीबड याठिकाणी आपल्या मोठ्या लेकीच्या घरी पोहोचले. यावेळी चिमुकल्याचा दफनविधी करण्यासाठी आरोपी बाप आपल्या मुलीला घेऊन समसगडच्या जंगलात गेला.
हेही वाचा-जळगावात दुचाकीस्वाराने गर्भवतीला नेलं फरफटत; पोटावरून बाईक गेल्यानं भयावह अवस्था
याठिकाणी गेलं असताना, प्रेमविवाह केल्यावरून बापलेकीत वाद झाला. या वादातून संतापलेल्या बापानं आपल्या पोटच्या लेकीवर अमानुषपणे बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने लेकीची गळा आवळून हत्या केली. त्यानं छिन्न विच्छिन्न अवस्थेत लेकीला जंगलात सोडून नराधमाने पळ काढला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत या घटनेची उकल केली आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुलीनं प्रेमविवाह केल्यानं गावातील लोकं टोमणे मारत होते, याच रागातून आपण मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Rape