मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

"आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ'' मुख्यमंत्र्यांनंतर संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

"आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ'' मुख्यमंत्र्यांनंतर संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

स्वबळावर निवडणुका लढण्याच्या या नाऱ्यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस पक्षाला सणसणीत टोला लगावला. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 20 जून: महाराष्ट्र राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी (Maha vikas aghadi) सरकार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) स्वबळावर लढण्याची भूमिका घेताना दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं नाना पटोले यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर स्वबळावर निवडणुका लढण्याच्या या नाऱ्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस पक्षाला सणसणीत टोला लगावला. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमातून संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या संबोधनात म्हटलं, अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ, स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे. निवडणुका येतात आणि जातात. ममतांनी ताकद दाखवून दिली, त्याला स्वबळ म्हणतात. बंगाली माणसांनी निर्भिडपणे मतं मांडलं, स्वत्व काय असतं हे बंगालने दाखवून दिलं. प्रादेशिक अस्मिता कशी जपायची याचं उदाहरण बंगालने घालून दिलं, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.

हेही वाचा- 'हे' लक्षात असू द्या, गृहमंत्रालयाच्या राज्यांना कडक सूचना

काय म्हणाले संजय राऊत

आतापर्यंत शिवसेनेने स्वत: च्या बळावर राजकीय लढाई लढविली आहे. निवडणुकीत युती असो वा नसो, लढाई स्वबळावर लढली जाते, असं संजय राऊत म्हणाले आहेत. काल काल शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन होता. काल आगामी काळात पक्षाची भूमिका काय असेल, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

तसंच त्यांनी हे देखील म्हटलं, राज्यात जे स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत, जर ते स्वबळाची भाषा करत असतील तर आम्ही असंच बसून राहू का? ज्यांना स्वबळावर लढायचं आहे त्यांनी लढावं, असं संजय राऊत म्हणालेत.

First published:

Tags: Sanjay raut, Shivseana, Uddhav thackeray