कोरोना व्हायरससंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांना खबरदारीचा इशारा

COVID-19 cases in India: केंद्रीय गृह मंत्रालयानं (Ministry of Home Affairs) देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे.

COVID-19 cases in India: केंद्रीय गृह मंत्रालयानं (Ministry of Home Affairs) देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 20 जून: केंद्रीय गृह मंत्रालयानं (Ministry of Home Affairs) देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात केंद्राकडून कोरोना (Corona Virus) व्हायरस सारख्या महामारीविषयी काही खास मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यातील मुख्य सचिवांना हे पत्र लिहिलं आहे. सर्व राज्यात कोविड 19 चा उपयुक्त व्यवहार सुनिश्चित करणं तसचं टेस्ट, ट्रॅक, ट्रीटमेंट, लसीकरण धोरणाचे पालन करताना कोणत्याही प्रकारचा विलंब करु नये, असं सांगण्यात आलं आहे. गृह मंत्रालयानं आपल्या पत्रात सर्व राज्यांना कोरोना व्हायरस लॉकडाऊन आणि अनलॉकबाबत काही सूचना दिल्या आहेत. गृह मंत्रालयानं आपल्या पत्रात लिहिलं आहे की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अनलॉक करताना सावधानता बाळगावी. सावधानपूर्वक निर्बंध शिथिल करण्यात यावं. तसंच लॉकडाऊन उठवताना कोविडचे उपयुक्त व्यवहार, टेस्ट-ट्रॅक-ट्रीटमेंट-लसीकरण या रणनितीचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही राज्यांमधील निर्बंध शिथिल केल्यामुळे बाहेर कोविडच्या नियमांचं योग्य पालन केलं जात नाही आहे. त्यामुले लोकांची गर्दीही वाढलेली दिसत आहे. अशा गोष्टी थांबवण्याची गरज असल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. पत्रात असेही लिहिलं आहे की, कोरोनाची चेन तोडण्यासाठी लसीकरण करणं महत्वाचे आहे. म्हणूनच राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणाचा वेग वाढवावा. खबरदारी घेणे आवश्यक- आरोग्यमंत्री केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, केंद्र सरकारने गेल्या वर्षी कोरोना सारख्या महामारीचा सामना करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही कोरोना रुग्णांचा आकडा कमी स्तरावर आणू शकलो. मात्र लसीकरण सुरु झाल्यानंतर नागरिक निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करणं थांबवलं आणि त्यामुळे देशाला भयानक दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागला. आता सतर्क राहून नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
    Published by:Pooja Vichare
    First published: