मराठी बातम्या /बातम्या /nagpur /आजी-मामीसोबतची मस्करी जीवावर बेतली, नागपुरात 12 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

आजी-मामीसोबतची मस्करी जीवावर बेतली, नागपुरात 12 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

Massive Gas Fire in Nagpur: राज्याची उपराजधानी नागपुरात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आजी आणि मामीसोबत मस्करी करणाऱ्या एका 12 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू ( 12 years old minor boy death) झाला आहे.

नागपूर, 02 नोव्हेंबर: राज्याची उपराजधानी नागपुरात (Nagpur) हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आजी आणि मामीसोबत मस्करी (raillery with grand mother and aunt) करणाऱ्या एका 12 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. संबंधित मुलाने आपल्या आजी आणि मामीला घाबरवण्यासाठी स्वयंपाकघरातील गॅसचा पाइप काढला होता. गॅसचा पाइप काढताच संबंधित मुलगा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या या मुलाला नातेवाईकांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण रुग्णालयात जाताच मुलाचा मृत्यू (minor boy died in massive gas fire) झाला आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवसात मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपुरातील सिव्हिल लाइंसच्या सीपीडब्ल्यूडी कॉलनीत राहणारा मुलगा इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. संबंधित मुलगा अडीच वर्षांचा असताना, त्याचे आई-वडील विभक्त झाले होते. त्यामुळे तो अगदी लहानपणापासून आपल्या आजीकडे राहत होता. त्याची आई सध्या छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे वास्तव्याला आहे.

हेही वाचा-अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाकडून रेप; गुप्तांगात मिरची टाकून दिल्या नरक यातना

दरम्यान, घटनेच्या दिवशी दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत मुलाची आजी (वय-60) आणि मामी (वय-26) दोघंही स्वयंपाक घरात काम करत होते. याच वेळी मृत मुलाला मस्करी सुचली. आपल्या आजी आणि मामीला घाबरवण्यासाठी संबंधित मुलाने स्वयंपाक घराची गॅसची नळी काढायला सुरुवात केली. त्यामुळे आजी आणि मामीने त्याला झापलं. पण तरीही त्याची मस्करी थांबली नाही. अखेर अल्पवयीन मुलाची मस्करी त्याच्या अंगलट आली.

हेही वाचा-पोत्यात आढळला महिलेचा मृतदेह; अंगातील गाऊन अन् पायातील दोरा उलगडणार मृत्यूचं गूढ

गॅसचा पाइन ओढताच घरात अचानक आगीचा भडका झाला. ही आग इतकी भीषण होती की पुढच्याच क्षणात संबंधित मुलाचं संपूर्ण शरीर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं. या दुर्दैवी घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाला नातेवाईकांनी त्वरित रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. या आगीच्या घटनेचा आजीलाही अनेक ठिकाणी भाजलं आहे.

First published:

Tags: Crime news, Nagpur