मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत ठाकरे कुटुंबातून कोण येणार? अशोक चव्हाण म्हणाले...

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत ठाकरे कुटुंबातून कोण येणार? अशोक चव्हाण म्हणाले...

'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील काँग्रेस कडून निमंत्रण देण्यात आले आहे, ते सहभागी होणार आहे की नाही'

'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील काँग्रेस कडून निमंत्रण देण्यात आले आहे, ते सहभागी होणार आहे की नाही'

'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील काँग्रेस कडून निमंत्रण देण्यात आले आहे, ते सहभागी होणार आहे की नाही'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nanded, India

नांदेड, 22 ऑक्टोबर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातली राजकारण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रातून लवकरच भारत जोडो यात्रा पोहोचणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे होणार सहभागी होणार आङे, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिलेलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुढील महिन्यात नांदेड मध्ये येणार आहे. सात नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये येईल. नांदेडमध्ये ही यात्रा पाच दिवस राहणार आहे. नऊ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. तर आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार असल्याची माहिती माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील काँग्रेस कडून निमंत्रण देण्यात आले आहे, ते सहभागी होणार आहे की नाही, ते लवकरच स्पष्ट करतील, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

('मुंबईच्या ठाकरेंची आजही दहशत, NCP च्या नादाला लागाल तर हात...', देवेंद्र भुयार यांचा थेट इशारा)

दरम्यान, राज्य सरकारने अतिवृष्टीचे पैसे अजून दिले नाही. दिवाळी १०० रुपयांमध्ये शिधा वाटपाची घोषणा केली खरी पण अजून शिधा वाटप नाही. आता पुन्हा परतीच्या पावसामुळे राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता सरकारने नुसत्या घोषणा करू नये तर शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्यावी, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली.

('पुणे बदलतंय की पुणे तरंगतंय', शिवसेनेनं उडवली भाजपची खिल्ली)

'राज्य सरकारने एमआयडीसीच्या जागांवरची स्थगिती उठवून उद्योजकांना मदत केली. ही चांगली गोष्ट आहे. पण जिल्ह्या-जिल्ह्यात सार्वजनिक कांमाना दिलेली स्थगिती कधी उठवणार आहात? असा सवालही अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला विचारला.

'राज्य सरकारने अनेक जिल्ह्यातील अनेक विकास कामांना स्थगिती दिली. त्यामुळे राज्याच नुकसान होत आहे. सरकारची ही भूमिका चुकीची असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.

First published:

Tags: Marathi news, Rahul gandhi, Sharad Pawar, Uddhav tahckeray