Home /News /maharashtra /

''...त्यांचं शेवटचं दर्शनही मला घेता आलं नाही'',धनंजय मुंडेंनी सांगितली जीवनात आयुष्यभर सलत राहणारी गोष्ट

''...त्यांचं शेवटचं दर्शनही मला घेता आलं नाही'',धनंजय मुंडेंनी सांगितली जीवनात आयुष्यभर सलत राहणारी गोष्ट

धनंजय मुंडे यांनी आयुष्यात हळवा करणारा प्रसंग सांगितला आहे.

  बीड, 28 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader)आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी काही अनुभव शेअर केलेत. तसंच धनंजय मुंडे यांनी आयुष्यात हळवा करणारा प्रसंग सांगितला आहे. यावेळी त्यांनी असा एक प्रसंग सांगितला आहे की धनंजय मुंडेंनी वडिलांचं नाही तर काका गोपीनाथ मुंडेंचं (Gopinath Munde) ऐकलं. धनंजय मुंडेंनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत हे सर्व सांगितलं आहे. आयुष्यातील असा कोणता प्रसंग होता जो आताही आठवला तरी तुम्हाला हळवं व्हायला होतं, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर धनंजय मुंडे म्हणाले की, मी स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर जेव्हा दिल्लीला गेलो होतो. दिल्लीला गेल्यानंतर पार्टी ऑफिसमधून त्यांचं पार्थिव विमानतळाकडे निघालं होतं. विमानतळावरुन ते मिलिट्रीच्या विमानापर्यंत ते लातूरपर्यंत नेणार होते. माझं तिथे रस्त्यातच पार्थिवाचं दर्शन झालं. तेथून मी विमानतळावर गेलो. मी खूप दुखी होतो. त्यावेळी मला साहेबांसोबत विमानात जाता आलं नाही. आणि अग्नी देतानाही शेवटचं दर्शन घ्यायचं म्हणतात, त्यांचं शेवटचं दर्शनही मला घेता आलं नाही. ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये आयुष्यभर मला सलत राहणारी गोष्ट आहे. हेही वाचा- 'पोलिसांमध्ये आमचे खबरी...' गौतम गंभीरला तिसऱ्यांदा मिळाली जीवे मारण्याची धमकी! तसंच माझ्यावर मुंडे साहेबांचं प्रभाव जास्त असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यावेळी वडिलांचं नाहीतर काकांचं ऐकलं... अण्णांची आणि गोपीनाथ मुंडे यांची दोघांची अशी एखादी आठवण किंवा एखादा प्रसंग जो कायम तुमच्या लक्षात आहे, असा प्रश्न मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर सांगताना धनंजय मुंडे म्हणाले की, एक आठवण माझ्या लक्षात आहे. 2002 चा तो काळ असावा. जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. त्याचवेळी घरात असं ठरलं होतं की, धनंजयनं जिल्हा परिषदेची निवडणूक लढायची आणि अण्णांनी लढायची नाही. अण्णांनी ते स्वतःच ठरवलं होतं. माझ्या घरी, स्वर्गीय मुंडे साहेब, अण्णा आणि मी बसलो होतो. धनंजयला उभं करायचं तर कुठे, कसं काय करायचं यावर चर्चा सुरु होती. त्यावर माझ्या वडिलांचं मत होतं की, होम ग्राऊंड आहे. गाढी पिंपळगाव असं नाव होतं, त्या गटाचं तिथेचं धनंजयला उभं करायचं. सोप्या मतदारसंघात उभं करायचं. त्यावर मुंडे साहेबांचं म्हणणं होतं की नाही पट्टी वडगाव येथून स्वतः मुंडे साहेब निवडून आले होते. त्या जिल्हा परिषद गटातून धनंजयनं उभं राहायला पाहिजे. त्यावरुन त्या दोघांचाही एवढा वाद झाला माझ्यावरुन मग शेवटी मुंडेसाहेब म्हणाले, तू आणि मी भांडण्यापेक्षा धनंजयला ठरवू द्या. त्याला कुठे उभं राहायचं आहे. ज्यावेळेस मला विचारलं वडिलांनी की कुठं उभं राहायचं आहे. त्यावर मी पट्टी वडगावचं म्हटलं. त्यावर असा प्रसंग होता की, वडील एक महिना बोलत नव्हते. त्यांना असं वाटलं की धनंजय पट्टी वडगावमध्ये पडेल. पण त्यावेळी त्यांनी दुसऱ्या गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढली.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: BJP, Dhananjay munde, NCP

  पुढील बातम्या