जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'छोटा पप्पू गोधडीमध्ये होता, तेव्हा मी...'; अब्दुल सत्तारांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका

'छोटा पप्पू गोधडीमध्ये होता, तेव्हा मी...'; अब्दुल सत्तारांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका

फाईल फोटो

फाईल फोटो

छोटा पप्पू काही बोलू शकतो याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं. ते जेव्हा गोधडीमध्ये होते तेव्हा मी शेतकऱ्यांचे नेतृत्व करत होतो, असं सत्तार आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मनीष खरात, हिंगोली 28 ऑक्टोबर : राज्याचे कृषिमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंवर टीका करताना त्यांनी आदित्य यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केला आहे. छोटा पप्पू काही बोलू शकतो याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं. ते जेव्हा गोधडीमध्ये होते तेव्हा मी शेतकऱ्यांचे नेतृत्व करत होतो, असं सत्तार आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले.

Andheri East Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत नवी समस्या, ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं, निवडणूक रद्द होणार? अब्दुल सत्तार म्हणाले, की आता हे गोधडीमधून निघालेले लोक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात सरकार चांगलं आणि गतिमान चालत आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठतोय, अशी घणाघाती टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. अब्दुल सत्तार हे आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरेंनी केलेली टीका - टाटा एअरबस निर्मिती प्रकल्प गुजरातला होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही, हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला होता. यावरही अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘न्याय मागून मिळणार नसेल तर कानफाडात खेचून..’; खासदार ओमराजेंचा सरकारला अल्टीमेटम अब्दुल सत्तार म्हणाले, की तो प्रकल्प कधी बाहेर गेला आणि कसा गेला? तेव्हा नेमकी काय तारीख होती? हे बारकाईनं पाहिलं तर त्यांच्या सगळं लक्षात येईल. 21 सप्टेंबर 2021 ला हा प्रकल्प गुजरातला गेला. तेव्हा त्यांचे वडील मुख्यमंत्री होते आणि जे बोलत आहेत ते तेव्हा कॅबिनेट मंत्री होते, असं प्रत्युत्तर सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात