मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'स्वच्छ' प्रतिमेचं काय? अब्दुल सत्तारांपासून संजय राठोडांपर्यंत वादात अडकलेल्या या आमदारांनीही घेतली शपथ, केसेस मागे?

'स्वच्छ' प्रतिमेचं काय? अब्दुल सत्तारांपासून संजय राठोडांपर्यंत वादात अडकलेल्या या आमदारांनीही घेतली शपथ, केसेस मागे?

मंत्रिमंडळ विस्तारावेळी(Cabinet Expansion) काही केसेस दाखल असलेल्या आमदारांनीही शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या आमदारांवरून केस बंद केल्या गेल्या का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावेळी(Cabinet Expansion) काही केसेस दाखल असलेल्या आमदारांनीही शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या आमदारांवरून केस बंद केल्या गेल्या का? असा सवाल उपस्थित होत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावेळी(Cabinet Expansion) काही केसेस दाखल असलेल्या आमदारांनीही शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या आमदारांवरून केस बंद केल्या गेल्या का? असा सवाल उपस्थित होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 09 ऑगस्ट : शिंदे आणि भाजप सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. मात्र, आज अखेर या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात झाली. या विस्तारामध्ये नव्या चेहऱ्यांना आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना संधी दिली जाईल, असं समोर आलं होतं. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारावेळी काही केसेस दाखल असलेल्या आमदारांनीही शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे या आमदारांवरून केस बंद केल्या गेल्या का? असा सवाल उपस्थित होत आहे.

BREAKING : सरकारमध्ये 'मिस्टर क्लिन' नेत्यांना संधी, शिंदे गटातील 2 जणांचा पत्ता कट?

अब्दुल सत्तार -

मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवस आधी म्हणजेच सोमवारीच अब्दुल सत्तार यांच्याबद्दलची मोठी बातमी समोर आली होती. टीईटी घोटाळा प्रकरणातील यादीत अब्दुल सत्तार यांच्या मुली आणि मुलांचही नाव होतं. टीईटी घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळ्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सत्तार यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

संजय राठोड -

पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या संजय राठोड यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, संजय राठोडांवरच्या केस बंद करण्यात आल्या आहेत. राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेताच चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 'संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे….जितेंगे' असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Cabinet Expansion :अब्दुल सत्तार, संजय राठोड होणार मंत्री? एकूण 18 जणांचा शपथविधी, संपूर्ण यादी

विजयकुमार गावित -

माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गावित यांच्यावर २००४ ते २००९ या काळात मंत्रीपदी असतना आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, भाजपने त्यांना संधी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Sanjay rathod