जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Cabinet Expansion :अब्दुल सत्तार, संजय राठोड होणार मंत्री? एकूण 18 जणांचा शपथविधी, संपूर्ण यादी

Cabinet Expansion :अब्दुल सत्तार, संजय राठोड होणार मंत्री? एकूण 18 जणांचा शपथविधी, संपूर्ण यादी

रात्री पर्यंत 8 भाजप आणि 8 शिंदे शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे फायनल झाली होती. पण रात्री उशिरा...

रात्री पर्यंत 8 भाजप आणि 8 शिंदे शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे फायनल झाली होती. पण रात्री उशिरा...

रात्री पर्यंत 8 भाजप आणि 8 शिंदे शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे फायनल झाली होती. पण रात्री उशिरा…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 ऑगस्ट : गेल्या महिन्यापासून रखडेला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज होणार आहे. (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल 39 दिवसानंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे. एकूण 18 जण मंत्रिपदीची शपथ घेणार आहे. टीईटी घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले अब्दुल सत्तार सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यांच्यासह संजय राठोड यांचेही नाव समोर आले आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता काही तास उरले आहे. इच्छुक आमदार हे मुंबईत दाखल झाले आहे. सकाळी ११ वाजता या भावी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मंगळवारपर्यंत ९ जण शपथ घेणार अशी शक्यता होती. पण रात्रभरात हालचालींना वेग आला. शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची नावे वाढवणे सुरू आहे. रात्री पर्यंत ८ भाजपा आणि ८ शिंदे शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे फायनल झाली होती. पण रात्री उशिरा अब्दुल सत्तार आणि मंगलप्रभात लोढा यांची नावे वाढवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच, पूजा चव्हाण प्रकरणामुळे मंत्रिपद गमावलेले संजय राठोड यांचे नाव सुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. संजय राठोड सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. एकूण १८ मंत्री शपथ घेतील शिंदे गटाकडून हे मंत्री घेणार शपथ दादा भुसे संदीपान भुमरे गुलाबराव पाटील उदय सामंत शभुराजे देसाई तानाजी सावंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर संजय राठोड भाजपकडून हे नेते घेणार शपथ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार रवींद्र चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील विजयकुमार गावित सुरेश खाडे अतुल सावे मंगल प्रभात लोढा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात