नकोत जाती-धर्माच्या भिंती, अब्दुल सलाम यांनी देवदूतांसाठी उपलब्ध करुन दिलं हॉटेल!

देशावर कोरोना नामक मोठं संकट आलं आहे. अशा परिस्थितीत ठाण्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अब्दुल सलाम यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

देशावर कोरोना नामक मोठं संकट आलं आहे. अशा परिस्थितीत ठाण्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अब्दुल सलाम यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

  • Share this:
ठाणे, 23 एप्रिल: देशावर कोरोना नामक मोठं संकट आलं आहे. अशा परिस्थितीत ठाण्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अब्दुल सलाम यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. अब्दुल सलाम यांनी आपल्या मालकीचे हॉटेल कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उपलब्ध करुन दिलं आहे. हेही वाचा.. मालेगावात कोरोनाचं थैमान सुरूच, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 110 वर देशामधील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाच डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस कामामध्ये व्यस्त आहेत. ठाण्यामध्येही करोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याने डॉक्टर नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम वाढले आहे. या सर्वांना दिलासा देण्यासाठी हॉटेल व्यावसायिक अब्दुल सलाम यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी जांभळी नाका,भाजी मार्केट लगत असलेले आपल्या मालकीचे 'टाईम्स स्क्वेअर' ( Times square) हॉटेल कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. हेही वाचा..मुंब्य्रात अटक करण्यात आलेल्या 25 तबलिगींची जामिनावर सुटका मुंबई महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. आरोग्य सेवेतील डॉक्टर, नर्स व आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी हे दिवस रात्र काम करीत आहेत. रुग्ण सातत्यानं वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढत आहे. जे कोरोनाग्रस्तांची सेवा करतात त्यांची चांगली सोय व्हावी किंवा त्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी माझे 'टाईम्स स्क्वेअर' हॉटेल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशावरून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याना दिले आहे. तसेच मुंबई येथील हॉटेल देखील आयसोलेशन वॉर्डसाठी निर्मितीसाठी मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे अब्दुल सलाम यांनी सांगितले. संपादन- संदीप पारोळेकर
First published: