मुंब्य्रात अटक करण्यात आलेल्या 25 तबलिगींची जामिनावर सुटका

मुंब्य्रात अटक करण्यात आलेल्या 25 तबलिगींची जामिनावर सुटका

हे सर्वजण मशिदीमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांचा कुणाशीही संपर्क आला नाही.

  • Share this:

ठाणे, 23 एप्रिल : दिल्लीतील निझामुद्दीनच्या मरकज येथून मुंब्य्रात तबलिगी  जमातीची लोकं आल्यामुळे खळखळ उडाली होती. डायघर येथून अटक करण्यात आलेल्या 25 तबलिगींना गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.  यामध्ये काही जण बांगलादेशी आणि मलेशिया येथील राहणारे आहेत.

मुंब्य्रातील अल नदीउल फला या शाळेच्या चार ट्रस्टींवर 8 परदेशी नागरिकांना कोणतीही परवानगी न घेता ठेवल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. तसंच तन्वीय उल उलूल मदर्सच्या ट्रस्टींवर देखील 13 परकीय नागरिक ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -'वाईन शॉप्स ते राज्याची तिजोरी' राज ठाकरेंनी दिला उद्धव ठाकरेंना सल्ला

ठाण्यातील मुंब्रा भागातील एका मशिदीमधून 14 बांगलादेशी आणि दोन आसामी तर दुसऱ्या अन्य एका मशिदीमधून 8 मलेशियन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेवून 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केलं होतं.  यातील काही जण 10 मार्चला निझामुद्दीन या ठिकाणावरून आले होते. क्वारंटाइनमध्ये असताना सर्वांची दोनदा कोरोना टेस्ट करण्यात आली होती. दोन्ही टेस्ट या निगेटिव्ह आल्या होत्या. त्या अनुषंगाने आज सर्वांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.

हे सर्वजण मशिदीमध्ये राहत होते. त्यामुळे त्यांचा कुणाशीही संपर्क आला नाही. त्याच बरोबर सुदैवाने वादग्रस्त मरकज कार्यक्रमाशी यांचा काही संबंध नाही. कारण ही लोकं 10 मार्चच्या आधीच इथं परतले होते, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

 

संपादन - सचिन साळवे

First published: April 23, 2020, 6:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading