जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आदित्य पहिल्यांदाच बिहारमध्ये, पण राऊत आऊट! ठाकरेंचा 'संजय' साईडलाईनला का?

आदित्य पहिल्यांदाच बिहारमध्ये, पण राऊत आऊट! ठाकरेंचा 'संजय' साईडलाईनला का?

आदित्य पहिल्यांदाच बिहारमध्ये, पण राऊत आऊट! ठाकरेंचा 'संजय' साईडलाईनला का?

आदित्य यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातला एखादा नेता पहिल्यांदाच बिहारमध्ये पोहोचलाय. मात्र या मोठ्या घडामोडीत खासदार संजय राऊत कुठेच दिसले नाहीत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 नोव्हेंबर : महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच ठाकरे आडनावाभोवती फिरत राहिलंय. ठाकरे कुटुंबानंही महाराष्ट्रावरच भर दिलाय. मात्र आता आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातला एखादा नेता पहिल्यांदाच बिहारमध्ये पोहोचलाय. मात्र या मोठ्या घडामोडीत खासदार संजय राऊत नव्हे तर खासदार अनिल देसाई आदित्य यांच्या सोबत होते. याचाच अर्थ संजय राऊतांना साईडलाईन करण्यात आलंय का? असा प्रश्न निर्माण झालाय. बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात मराठी युवा नेत्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. ठाकरे कुटुंबानं महाराष्ट्रची सीमा ओलांडून पहिल्यांदाच बिहारमध्ये पाऊल ठेवलं. या दौऱ्यात खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि खासदार अनिल देसाई आदित्य ठाकरेंसोबत होते. तेजस्वी यादव यांच्या भेटीच्या वेळीही अनिल देसाई सोबत होते. तेजस्वींना भेटून आदित्य ठाकरे नितीश कुमारांकडे, तिसरी आघाडी होणार का? स्पष्टच सांगितलं आदित्य ठाकरे यांच्यासोबत नेहमीच खासदार संजय राऊत दिसून येतात, मात्र हा दौरा अपवाद ठरलाय. हिंदी भाषिक राज्यांमध्ये आदित्य ठाकरे दौरा करतात, ही पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. मात्र या महत्त्वाच्या घडामोडीत आदित्य यांच्यासोबत संजय राऊत नव्हे तर अनिल देसाई होते. यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झालीय. नुकतेच जेलमधून जामीनावर बाहेर आलेले संजय राऊत यांच्याऐवजी अनिल देसाईंचं महत्त्व वाढलंय का? असा प्रश्न आता निर्माण झालाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात