मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aditya Thackeray : तेजस्वींना भेटून आदित्य ठाकरे नितीश कुमारांकडे, तिसरी आघाडी होणार का? स्पष्टच सांगितलं

Aditya Thackeray : तेजस्वींना भेटून आदित्य ठाकरे नितीश कुमारांकडे, तिसरी आघाडी होणार का? स्पष्टच सांगितलं

राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच युवासेनेचे नेते आदित्य उद्धव ठाकरे हे आज (दि. 23) एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले आहेत.

राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच युवासेनेचे नेते आदित्य उद्धव ठाकरे हे आज (दि. 23) एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले आहेत.

राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच युवासेनेचे नेते आदित्य उद्धव ठाकरे हे आज (दि. 23) एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

पटना, 23 नोव्हेंबर : राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच युवासेनेचे नेते आदित्य उद्धव ठाकरे हे आज (दि. 23) एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यात भेट झाली. या दोन्ही युवा नेत्यांची भेट झाल्याने दोन राज्यांमध्येच नाही तर देशात याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही भेटले आहेत.  यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांसोबत चर्चा केली. आदित्य यांच्यासोबत तेजस्वी यादवही होते.

तेजस्वी यादव यांची आणि माझी नेहमी चर्चा असते परंतु कोरोनामुळे आमची मागच्या काही काळात भेट झाली नाही. तेजस्वी यादव यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही माझी भेट झाली आहे. या दोघांमध्ये दोन्ही राज्यातील विकासाच्या मुद्दावर आमची चर्चा झाली. यामध्ये पर्यावरण, राज्यातील उद्योगधंदे तसेच देशातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी काय करता येईल याविषयावर आमची चर्चा झाल्याचे आदित्य म्हणाले. या देशात सध्या युवक बेरोजगार राहू नयेत तसेच महागाईवर काम करण्यसााठी आम्ही एकत्र आलो आहे.

हे ही वाचा : 'जिंकण्यासाठी मैदानात उतरायचं, कामाला लागा', उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना नवे आदेश

आमच्यातील भेट ही राजकीय किंवा निवडणुकांच्या दृष्टीने नव्हती आम्ही मैत्रीपूर्ण भेटीसाठी येथे आलो असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. आमचे यापूर्वी दोन्ही कुटुंबातील संबंध चांगले आहेत. आम्ही पुढे आमची मैत्री अशीच ठेवणार आहे. कृपया कोणीही याकडे राजकीय दृष्टीकोणातून पाहू नये असे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

तसेच मी तेजस्वी यादवांना मुंबई पाहण्यासाठी आमंत्रण दिले आहे. तेजस्वी यादव यांचे काम चांगले आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही पुढे काम करत असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्याच्या हितासाठी फक्त आपण सत्तेत असायला हवं असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंना शिवरायांची मुर्ती देत केलं अभिनंदन

तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचं शिवाजी महाराज यांची अर्धाकृती मूर्ती देत स्वागत केलं. तसेच आदित्यसोबतचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले. यावेळेस आदित्य यांच्यासोबत शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चर्तुवेदी याही होत्या.

हे ही वाचा : नितेश राणे निघाले CBI च्या पुढे, दिशा सालियनबद्दल पुन्हा केला नवा दावा

भाजपचा आदित्य ठाकरेंवर रोष

भाजपने या भेटीवरुन दोन्ही नेत्यांवर हल्लाबोल केलाय. भाजपने अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन हा हल्लाबोल केलाय.  भाजप बिहारमध्ये विरोधी पक्षात आहे. यादव-ठाकरे भेटीवरुन भाजप प्रवक्ता आणि ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री निखिल आनंद यांनी हल्ला चढवला.

First published:

Tags: Aaditya Thackeray, Bihar, Shiv Sena (Political Party)