भाऊ दारू पिऊन घरात घालायचा धिंगाणा, लहान भावाला राग आला आणि...

भाऊ दारू पिऊन घरात घालायचा धिंगाणा, लहान भावाला राग आला आणि...

संतोष थोरे या व्यक्तीला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या प्रचंड आहारी गेला होता.

  • Share this:

नाशिक, 22 जून : मोठा भाऊ दारू पिऊ घरात भांडणे करतो आणि इतरांना त्रास देतो म्हणून लहान भावानेच आपल्या मोठ्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

पोलिसांना मृतदेह पेठ रोडवरील नामको कँन्सर हॉस्पिटलच्यासमोर रस्त्यालगत आढळून आला आहे. संतोष सखाराम थोरे (वय 40) मृत व्यक्तीचं नाव असून ते मखमलाबाद भागातील रहिवासी आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष थोरे या व्यक्तीला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या प्रचंड आहारी गेला होता.  तो दारू पिल्यानंतर पत्नीला त्रास द्यायचा आणि मारहाण करायचा. त्यामुळे संतोषच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. तरीही तो दारू पिल्यानंतर घरातील नातलगांना त्रास द्यायचा. याचाच लहान भावाला राग होता.

'कोरोनिल'ची किंमत किती आणि मिळणार कधी? बाबा रामदेवांनी केले स्पष्ट

सोमवारी रात्री संतोष थोरे पुन्हा दारू पिऊन घरी आला. दारूच्या नशेत त्याने पुन्हा एकदा घरात धिंगाणा घातला. त्यामुळे संतप्त झालेल्या लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या भावावर हल्ला केला. बेदम मारहाण केल्यानंतर दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर संतोषचा मृतदेह हा

पेठ रोडवरील नामको कँन्सर हॉस्पिटलच्यासमोर रस्त्याच्या बाजूला फेकून दिला.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले असून दुसरा संशयित फरार झाला आहे.  पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: June 23, 2020, 2:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading