Home /News /maharashtra /

महावितरणचा भोंगळ कारभार! गवत कापण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू

महावितरणचा भोंगळ कारभार! गवत कापण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू

सोलापुरात महावितरणच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

सोलापूर, 31 जुलै: सोलापुरात महावितरणच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महावितरणच्या ढिसाळपणामुळे एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा गावात ही घटना घडली आहे. अरुण खांडेकर (वय-34) असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. हेही वाचा....हे एकट्याचं डोकं नाही, राज ठाकरेंना सोनू सूदच्या आर्थिक क्षमतेबाबत शंका अरुण खांडेकर यांच्या शेतातून गेलेल्या वीज कनेक्शनची वायर मागील दोन महिन्यांपासून जमिनीवर पडून होत्या. त्याबाबत ग्रावकऱ्यांकडून वारंवार महावितरण प्रशासनाला लेखी आणि तोंडी निवेदन देवूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर शनिवारी विजेचा शॉक लागून अरुण खांडेकर यांचा जागेवरच मृत्यू झाला. मिळालेली माहिती अशी की, अरुण खांडेकर हे यांचे बक्षी हिप्परगा गावात शेत आहे. सकाळी गवत कापण्यासाठी ते आपल्या शेतात गेले असता नजरचुकीने त्यांचा स्पर्श महावितरणच्या तारांना झाला. त्यामुळे त्यांना विजेचा जबर धक्का बसला आणि त्यानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान मागील सहा महिन्यापासून ग्रामपंचायतीच्यावतीने महावितरण प्रशासनाला तक्रार देण्यात आली होती. तरीही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र महावितरण प्रशासनाने याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. एकीकडे महावितरण प्रशासन वाढीव वीजबील आकारुन सर्वसामान्य नागरिकांना शॉक देत असतानाच दुसरीकडे सुविधांच्या बाबतीत मात्र ढिसाळपणा करत आहे. त्यामुळे याचा फटका एका शेतकरी कुटुंबाला बसला आहे. त्यामुळे या मृत्यू किंवा व्यवस्थेने घेतलेल्या बळीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर महावितरण प्रशासन काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. हेही वाचा...पावसात भाषण केल्यानं हमखास यश मिळतं, रावसाहेब दानवेंची शरद पवारांना कोपरखळी दरम्यान, 'News18 लोकमत'ने याबाबत पाठपुरावा केल्यानंतर महावितरणचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी पीडित कुटुंबास योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कामात कसूर केली त्यांच्यावरही करवाई करण्यात येईल. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती अभियंता पडळकर यांनी दिली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Solapur news

पुढील बातम्या