जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शाळेत जाणे राहून गेले, ट्रकच्या धडकेत 3 भावांचा जागीच मृत्यू

शाळेत जाणे राहून गेले, ट्रकच्या धडकेत 3 भावांचा जागीच मृत्यू

या तिन्ही भावंडाच्या अपघातील मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. म्हेत्रे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे

या तिन्ही भावंडाच्या अपघातील मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. म्हेत्रे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे

या तिन्ही भावंडाच्या अपघातील मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. म्हेत्रे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

जिंतूर, 24 जानेवारी : परभणी (parbhani) जिल्ह्यातील जिंतूरमध्ये (jintur) ट्रक आणि दुचाकीच्या (truck bike accident) धडकेत तीन भावांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे,  शाळा आणि महाविद्यालयाच्या पहिल्यादिवशी जाण्यासाठी निघालेल्या या तिन्ही भावांवर काळाने घाला घातला. जिंतूर तालुक्यातील आकोली शिवारामध्ये आज दुपारी ही दुर्घटना घडली. अभिषेक काशिनाथ म्हेत्रे (वय 18), योगेश काशिनाथ म्हेत्रे (वय 15), रामप्रसाद विश्वनाथ (वय 20) अशी मृत भावांची नाव आहे. ( बँक ऑफ बडौदा इथे ‘या’ पदांच्या तब्बल 220 Vacancy; कोणाला मिळणार संधी? वाचा ) कोरोनाच्या उद्रेकामुळे शाळा महाविद्यालय बंद होती. पण कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आज सोमवारपासून शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महिन्याभरानंतर तिन्ही भावंड  महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. तालुक्यातील आकोली शिवारामध्ये पोहोचले असता समोर येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात तिन्ही भावंडांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला होता. ( निवडणुकीमुळे नानांच्या डोक्यावर परिणाम झालाय’, फडणवीस नाना पटोलेंवर बरसले ) अभिषेक म्हेत्रे (वय 18) आणि योगेश म्हेत्रे (वय 15) ही दोघेही सख्खे भाऊ आहे. या तिन्ही भावंडाच्या अपघातील मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. म्हेत्रे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघातानंतर मयत युवकांचे पार्थिव, जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तर पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात