Home /News /maharashtra /

'निवडणुकीमुळे नानांच्या डोक्यावर परिणाम झालाय', फडणवीस नाना पटोलेंवर बरसले

'निवडणुकीमुळे नानांच्या डोक्यावर परिणाम झालाय', फडणवीस नाना पटोलेंवर बरसले

'ज्याची बायको पळून जाते त्याचं नाव मोदी ठेवलं जात आहे' असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजपनं राज्यभरात धुमशान घातलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 24 जानेवारी: 'ज्याची बायको पळून जाते त्याचं नाव मोदी ठेवलं जात आहे' असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजपनं राज्यभरात धुमशान घातलं आहे. भाजप (BJP) राज्यभरात नाना पटोलेंविरोधात आंदोलन करत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नाना पटोले यांच्यावरही टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसची झालेली अवस्था पाहाता नानांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. त्यामुळे मी त्यांच्या नेतृत्वाला सांगेन की त्यांनी त्यांच्या या युवा नेत्याला डॅाक्टरांना दाखवावं.' दुसरीकडे, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात आज भाजपच्या वतीने औरंगाबाद शहरातील सिडको बसस्थानक चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आंदोलक आणि पोलिसात झटापट झाली. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी नाना पाटोले यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलनामुळे बराचवेळ गोंधळाची परिस्थिती चौकात होती. यावेळी नाना पाटोले यांनी औरंगाबादेत पाय ठेऊन दाखवा. त्यांचे कपडे फाडू असा इशारा शहर अध्यक्ष संजय केनेकर यांनी दिला. हेही  वाचा-'आम्ही चोरुनमारुन शपथ घेतली नाही', उद्धव ठाकरेंचा भाजपवर चौफेर निशाणा सांगलीत पुतळ्याचं दहन नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पुन्हा आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे. पटोले यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभर भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीतही पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. हेही  वाचा-'भाजपला आम्ही पोसलं' आजारातून बरे होताच उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण यावेळी संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत हे पोस्टर फाडण्यात आले. नाना पटोले यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर पटोले यांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. परभणी मध्ये नाना पटोले यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आलं. तसंच परभणी मध्ये फिरू न देण्याचा इशाराही भाजपनं दिला आहे. काय म्हणाले होते नाना पटोले ज्याची बायको पळून जाते त्याचे नाव मोदी ठेवले जात आहे' असं म्हणत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांनी खोटा गावगुंड आणल्याचा आरोप केला आहे, असा प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, 'गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहे. भाजपची काय अवस्था झाली आहे, लोकं हे पाहून हसत आहे. ज्याची बायको पळून जाते त्याचे नाव मोदी ठेवले जात आहे. असं असताना अजून काय राहिलं आहे. हे प्रश्न विचारण्यापेक्षा मी भाजपला बेरोजगारी, महागाई, गरिबांचे प्रश्न आहे. त्याबद्दल ती बोलत नाही.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Maharashtra, Nana Patole, Shivsena

    पुढील बातम्या