Home /News /maharashtra /

शरद पवारांवरील वक्तव्य भोवलं, गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल

शरद पवारांवरील वक्तव्य भोवलं, गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल

'शरद पवार हे महाराष्ट्राला लागण झालेला कोरोना आहे', अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी विखारी भाषेत टीका केली होती.

बारामती, 25 जून : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. तर  बारामतीमध्ये गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागण झालेले कोरोना आहे', अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी विखारी भाषेत टीका केली होती. पडळकर यांच्या टीकेमुळे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे. आज राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पडळकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलनं करत आहे. बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. 'जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या मांडणार', असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. अखेर पोलिसांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पडळकर यांच्यावर 505(2)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अमर धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे. रामदेव बाबांना ठाकरे सरकारचा झटका, 'कोरोनिल'बद्दल घेतला मोठा निर्णय तर औरंगाबादेतही  गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. शहरातील क्रांतिचौक येथे निदर्शने करण्यात आली.  यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पडळकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार दिला आहे. एवढंच नाहीतर पडळकर यांचा मुखवटा घालून  तरुणाला उठाबशा काढण्यास लावल्या आहे. मनमाडमध्येही  शरद पवार यांच्या बाबतीत गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्त्याव्याचे पडसाद  उमटले. राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी तलाठी कार्यलयाच्या आवारात तीव्र निदर्शने करून पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत तिचे दहन केले. शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला सरड्यानं दिला 'जोर का झटका', काय केलं पाहा VIDEO तर सोलापूरमध्ये आज सकाळी शहरातील चार हुतात्मा स्मारकाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांविरोधात गाढव आंदोलन केले.  गाढवाच्या चेहऱ्यावर गोपीचंद पडळकरांची प्रतिमा लावून निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. काय म्हणाले होते पडळकर? 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही.  फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत' अशी जहरी टीका गोपीचंद पडळकरांनी  केली होती. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवायचा नाही. फक्त आरक्षणाचे राजकारण शरद पवार करत आहेत, असा आरोपही पडळकरांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांनी केली सारवासारव   गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर सारवासारव केली होती.  'शरद पवार हे राजकीय विरोधक आहे, शत्रू नाही. ज्येष्ठ नेत्यांबद्द्ल असे बोलणे चुकीचे आहे.  पडळकर यांनी भावनेच्या भरात वक्तव्य केले असून त्यांनी याबद्दल माफी मागितली आहे', असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. तसंच,  सर्वच पक्षातील लोकांनी बोलताना संयम बाळगला पाहिजे. ज्येष्ठ नेत्यांवर टीका करताना भान बाळगले पाहिजे, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं. संपादन - सचिन साळवे

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

First published:

पुढील बातम्या