मुंबई, 25 जून: काही दिवसांपूर्वी बिबट्या आणि माकड, बिबट्या आणि कुत्रा यांच्यातील शिकारीचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. कुत्र्यानं बिबट्याला पळवून लावल्यानंतर पुन्हा एकदा शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला चांगलाच झटका बसला आहे.
IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी बिबट्या आणि सरड्याच्या लढाईतला एक छोटासा भाग ट्वीट केला आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. सरड्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्यालाच हा सरडा आपल्या शेवटीनं थोबाडीत लगावून देतो आणि आपलं संरक्षण करतो. बिबट्या आणि सरड्याच्या लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Some other time Mr Leopard😳 pic.twitter.com/hkjaRb5ArP
— Susanta Nanda IFS (@susantananda3) June 24, 2020
Awesome video..जोर का झटका ,धीरे से लगा।
— Ravindra Mani Tripathi (@RavindraIfs) June 24, 2020
Current mare li
— Anant Raghav (@Anant__Raghav) June 25, 2020
सुशांत नंदा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 58 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 850 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे.
हे वाचा-भुंकणाऱ्या कुत्र्याला लाथ मारायला गेला तरुण, काय घडलं पाहा VIDEO
बिबट्या आणि सरड्याच्या या शिकारीच्या लढाईचा व्हिडीओ हा 19 जून 2018 मधला असल्याचं कळत आहे. युट्यूबवर हा व्हिडीओ 2018 मध्ये अपलोड करण्यात आला होता. सरडा आपल्या शेपटीनं बिबट्याला मारत राहातो आणि आपलं संरक्षण करतो. मार खाऊन वैतागलेला बिबट्या या सरड्याची मान पकडतो आणि या लढाईचा अखेर होतो असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. बिबट्यासमोर सरड्यानं सहजासहजी हार न मानता संरक्षणाचे पुरेपूर प्रयत्न केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.