जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : अमरावतीमध्ये दुकान कोसळलं, 4 जणाचे मृतदेह सापडले

BREAKING : अमरावतीमध्ये दुकान कोसळलं, 4 जणाचे मृतदेह सापडले

अमरावती शहरातील प्रभाग चौकात राजदीप बॅगचे दुकान कोसळले आहे. दुकानाच्या ढिगाराखाली तीन ते चार लोक दबल्याची माहिती समोर आली आहे

अमरावती शहरातील प्रभाग चौकात राजदीप बॅगचे दुकान कोसळले आहे. दुकानाच्या ढिगाराखाली तीन ते चार लोक दबल्याची माहिती समोर आली आहे

अमरावती शहरातील प्रभाग चौकात राजदीप बॅगचे दुकान कोसळले आहे. दुकानाच्या ढिगाराखाली तीन ते चार लोक दबल्याची माहिती समोर आली आहे

  • -MIN READ Amravati,Amravati,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 30 ऑक्टोबर : अमरावती जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. प्रभाग चौकात एक दोन मजली दुकान कोसळले आहे. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे.  घटनास्थळी स्थानिक लोक आणि अग्निशमन दलाचे मदतकार्य करत आहे. अमरावती शहरातील प्रभाग चौकात राजदीप बॅगचे दुकान कोसळले आहे. दुकानाच्या ढिगाराखाली तीन ते चार लोक दबल्याची माहिती समोर आली आहे. यातील ढिगाऱ्याखाली 4-5 जण दबले असण्याची शक्यता वर्तवली जात होती. दोन तासांपासून मदतकार्य सुरू आहे. या ढिगाऱ्याखालून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. इतर लोकांचा शोध सुरू आहे. (Kolhapur Chandgad : पुरोगामी कोल्हापूर नावालाच, दलित व्यक्तीच्या अंत्यविधीस विरोध, 8 तास ठेवलं अडवून!) पोलीस व महानगरपालिकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून ढिगार उपासण्याचे काम सुरू आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती पुढे येत आहे. महानगर पालिकेने ही इमारत पाडण्यासाठी या पूर्वीच नोटीस दिली होती. घटनास्थळी खासदार नवनीत राणा, आ.सुलभा खोडके दाखल झाल्या व पाहणी केली. (‘खड्ड्याकडे दुर्लक्ष का केलं?’; कोल्हापुरात अपघातात आईचा मृत्यू झाल्याने मुलावरच गुन्हा दाखल) दुकान कशाने कोसळले त्याचे कारण अजूनही समजले नाही.स्थानिक नागरिकांचे व पोलिसांचे बचाव कार्य सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात