जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादीकडून 51 हजारांचं बक्षीस!

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादीकडून 51 हजारांचं बक्षीस!

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादीकडून 51 हजारांचं बक्षीस!

दरम्यान, चिथावणीखोर भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • -MIN READ Baramati,Pune,Maharashtra
  • Last Updated :

बारामती, 11 डिसेंबर : वादग्रस्त विधान करणारे भाजपचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना घडण्याआधीच राष्ट्रवादीतून शाईफेक करणाऱ्याला 51 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणी आता 14 जणांवर बारामतीत गुन्हा दाखल झाल आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे राष्ट्रवादीचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून जो कोणी चंद्रकांत पाटील यांना काळे फासण्याचे काम करेल. त्याला 51 हजार रूपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चिथावणीखोर भाषण शोशल मीडियावर व्हायरल केले होते. (हल्ला प्रिप्लॅन, शाई कुणी फेकली? चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जो कोणी शाईफेक करेल त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चिथावणीखोर भाषण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्यानंतरही हे बक्षीस लवकरच मनोज बरकडेला दिले जाईल हा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता. या संदर्भात बारामती शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा :   शाईफेकीनंतर आता चंद्रकांत पाटलांविरोधात तक्रार; अडचणी वाढणार? ) दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शाईफेकीवरून गंभीर आरोप केले आहेत. हा हल्ला प्रिप्लॅन होता, कोणत्यातरी पत्रकाराने हे कृत्य केलं आहे, त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचाराच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे, त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे’, असं ट्विट रोहित पवार यांनी शाईफेकीच्या घटनेनंतर केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात