बारामती, 29 जानेवारी : बारामतीतील (baramati) एका पोलीस अधिकाऱ्याच्या युवतीबरोबर केलेल्या रासलिलांचे प्रकरण शमते न शमते तोच याच पद्धतीची आणखी एक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाचा तपास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने (Sub-Inspector Police baramti) एमपीएससीच्या परीक्षेच्या (mpsc exam) नावाखाली एका विवाहितेला पुण्यात ठेवले आणि हात-पाय मोडण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार संबंधित महिलेच्या पतीने पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. या प्रकरणाचे आदेश पोलीस अधिक्षकांनी दिले आहे. बारामतीत नुकतेच एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या रासलिलांची चर्चा रंगली होती. त्या वादग्रस्त अधिकाऱ्याची बदली करण्यात आलीआहे. पण आता हा नवाच प्रकार पुढे आला आहे. तालुक्यातील एका गावातील महिलेने कौटुंबिक वादातून विष प्राशन केले होते. या घटनेचा तपास संबंधित अधिकाऱ्याकडे होता. त्याने तक्रारदार महिलेचा मोबाईल क्रमांक घेत तिच्याशी चॅट सुरू केले. दिवसेंदिवस तिच्याशी संपर्क वाढवत जवळीक साधली. ती एमपीएससीचा अभ्यास करत असल्याची माहिती त्याला मिळाल्यावर त्याने तिला पुण्यात ठेवतो, तेथे लागेल ती मदत करतो, अशी भुरळ घातली. आपली पत्नी शिकून अधिकारी होईल या आशेपायी पतीने दोन मुली असताना तिला अभ्यासासाठी परवानगी दिली. ( मोठ्या भावाच्या अनुपस्थित छोट्याचे वहिनीसोबत संबंध; खुलासा होताच जिवानिशी गेला! ) परंतु, ती पुण्यात गेल्यानंतर तिने कुटुंबाशी संबंध तोडणे सुरू केले. 16 जानेवारी रोजी या अधिकाऱ्याच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर पतीला दिसला. यावरून त्या दोघात वाद झाले. अधिकाऱ्याने लागलीच तिच्या पतीला फोन करत जाब विचारला. ‘तुझे हात-पाय मोडीन’ अशी धमकी दिली आणि ‘मी तिला माझ्या कंपनीतील 10 टक्के वाटा देत आहे, तिला जर तू त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे’, अशी धमकी त्याने दिल्याचे रेकॉर्डिंग तिच्या पतीने व्हायरल केले आहे. हे प्रकरण गंभीर होत चालल्याचे लक्षात आल्यावर संबंधित तक्रारदार याने ही गोष्ट भावंडांना सांगितली. संबंधित कुटुंबाने लागलीच पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तातडीने अप्पर पोलीस अधिक्षक यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ( IPL : 7 वर्षांनी लिलावात उतरणार सगळ्यात धोकादायक खेळाडू, बोलीचे विक्रमही मोडणार! ) दरम्यान, या प्रकरणामुळे संबंधित महिलेच्या पतीला प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांना आता दोन लहान मुली आहेत. ‘आता या मुलींना मी आई कोठून आणून देऊ. माझे कुटुंब उद्वस्त झाले आहे’ अशी आगतिकता पतीने व्यक्त केली. यासंबंधी आलेल्या तक्रार अर्जावरुन चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यावरच यासंबंधी अधिक बोलता येईल, अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.