मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'या' शेअरमधून गुंतवणूकदारांना 210 टक्के रिटर्न्स, ICICI Securities ला अजूनही तेजीची आशा

'या' शेअरमधून गुंतवणूकदारांना 210 टक्के रिटर्न्स, ICICI Securities ला अजूनही तेजीची आशा

 ICICI सिक्युरिटीला असा विश्वास आहे की महिंद्रा लाइफस्पेसच्या शेअर्समध्ये (Mahindra Lifespace Share Price) अजूनही नफा कमावण्याची संधी आहे. त्यामुळे ब्रोकरेज फर्म हे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 31 ऑक्टोबर : रियल्टी स्टॉक महिंद्रा लाइफस्पेसने (Mahindra Lifespace) 2021 मध्ये आतापर्यंत 130 टक्के रिटर्न्स आपल्या गुंतवणूकदारांना दिले आहेत. गेल्या एका वर्षाचे रिटर्न पाहिले तर ते 210 टक्के आहेत. एवढे मोठे रिटर्न दिले असतानाही ICICI सिक्युरिटीला असा विश्वास आहे की महिंद्रा लाइफस्पेसच्या शेअर्समध्ये (Mahindra Lifespace Share Price) अजूनही नफा कमावण्याची संधी आहे. त्यामुळे ब्रोकरेज फर्म हे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहे.

महिंद्रा लाइफस्पेस शेअर्स गेल्या 5 वर्षात 16 टक्क्यांच्या CAGR ने वाढले आहेत. ऑक्टोबर 2016 मध्ये महिंद्रा लाइफस्पेसच्या शेअरची किंमत 133 रुपये होती, जी ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढून 278 रुपये झाली. ब्रोकरेज फर्मने हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देताना त्याची टार्गेट प्राईज किंमत 335 रुपये निश्चित केली आहे.

Post Office Scheme:दरमाह जमा करा 1500 रुपये, मिळवा 35 लाख; वाचा स्कीमबद्दल सर्वकाही

महिंद्रा लाइफस्पेसने आपली 5 वर्षांची योजना तयार केली आहे. या अंतर्गत, आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 2500 कोटी रुपयांची सेल्स वॅल्यू गाठायचे आहे. ICICI सिक्युरिटीने आपल्या एका नोटमध्ये लिहिले आहे की कंपनीने दरवर्षी 2000 कोटी रुपयांचे 4 जमीन व्यवहार करण्याचे टार्गेट ठेवले आहे. महिंद्र लाइफस्पेसने आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत चांगला निकाल दिला.

याला म्हणतात LUCK! पठ्ठ्याला लागला Jackpot; खरेदी केलेल्या वीसच्या वीस Lottery एकाच वेळी जिंकला

ब्रोकरेज फर्मने आपल्या नोटमध्ये लिहिले आहे की, पाईपलाईनमधील अनेक नवीन प्रोजेक्ट्स, 2308 कोटींची इनवेन्ट्री, मोठी लॅंड बँक आणि एक्सपान्शन प्लानसह अलीकडील व्यवस्थापन बदलाचा कंपनीला फायदा झाला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीचे म्हणणे आहे की या वैशिष्ट्यांमुळे कंपनीला आगामी काळात फायदा होईल. महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स ही महिंद्रा समूहाची रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी आहे. येत्या काळात 5 हजार एकरमध्ये प्रकल्प सुरू करणार आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market