मुंबई, 31 ऑक्टोबर: मुंबई ड्रग्ज प्रकरणी (Mumbai Cruise drug case) शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) तब्बल 28 दिवसांनंतर तुरुंगातून (Arthur Road Jail) घरी परतला आहे. मन्नतच्या बाहेर आणि मन्नतच्या आतमध्ये कुटुंबाने आर्यनचे जोरदार स्वागत केलं. दरम्यान, आर्यनने घरी परतताच २४ तासांत आपल्या सोशल मीडिया अकाउंट्स संदर्भात मोठं पाउल उचललं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याने एनसीबीला दिलेले वचन पाळले अशी चर्चा रंगली आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने (NCB) टाकण्यात आलेल्या धाडीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आता 28 दिवसांनी आर्यन खान याची आर्थर रोड तुरूंगातून सुटका झाली आहे. काल आर्थर रोड तुरुंगातून सुटून आर्यन खान मन्नतवर पोहोचला. आर्यन खान घरी पोहोचला तेव्हा किंग खानच्या फॅन्सनी त्याचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, घरी पोहोचल्यानंतर आर्यन खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटचा डीपी चेंज केला आहे. त्याने स्वत:चा फोटो आपल्या प्रोफाईलवरून हटवला आहे. डीपीमध्ये आता फोटोऐवजी व्हाईट बॅकग्राऊंड दिसत आहे. त्याबरोबरच त्याच्या काही जुन्या पोस्टही दिसत आहेत. दरम्यान, आर्यन खानने असे का केले हे कळू शकलेले नाही. त्याचा हा निर्णय पाहता युजर्सनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. जेलमध्ये असताना आर्यन चे काऊन्सेलिंग करण्यात आले होते. हे प्रत्येक ड्रग्ज प्रकरणातील आरोपीसोबत केले जाते. त्याचदरम्यान आर्यनने ‘यापुढे मी चांगले काम करेन आणि एक दिवस तुम्हाला माझ्यावर गर्व वाटेल’ असे मोठे विधान केले असल्याचे समोर आले होते. त्यामुळे जेलमधून सुटका होताच आर्यनची ही बदलेली भूमिका पाहता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिलेले वजन त्याने पाळले. या चर्चेने जोर धरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.