नवी दिल्ली, 12 एप्रिल : सध्या लोकांचं सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय राहण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. कोणाला मदत द्यायची असेल, कोणाला लोकप्रिय करायचं असेल अशी सर्व कामं अगदी काही मिनिटातच सोशल मीडियावर होताना दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अपील करत एखाद्या गरजू व्यक्तीला अर्थिक मदत दिल्याचेही आपण पाहिले. सैय्यद इसाक या व्यक्तीच्या बाबतही असंच काहीसं घडलं. रोजंदारी करणारे इसाक शिक्षण प्रसारासाठी लायब्ररी (Library) चालवत. ही लायब्ररी आगीत जळून खाक झाली. त्यानंतर लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मदत केली. सोशल मीडियाचा असा वापर खरंच दिशादर्शकच म्हणावा लागेल.
म्हैसुरु येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक सैय्यद इसाक यांची लायब्ररी होती. ते रोजंदारी मजूर आहेत. नुकतीच त्यांची ही लायब्ररी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामुळे सर्व पुस्तकं जळून खाक झाली. जेव्हा त्यांच्या या नुकसानाची माहिती लोकांना समजली तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला.
याबाबत इसाक यांनी माहिती देताना सांगितलं, की माझ्या लायब्ररीत कुराण, भगवद्गीता, बायबलसह 11 हजार पुस्तकं होती. यातील बहुतांश पुस्तकं ही कन्नड भाषेतील होती. इसाक म्हणाले, ‘ही लायब्ररी मी 2011 पासून चालवतो. माझ्या या संग्रहात सर्व धर्मांची पुस्तके होती. मात्र आग लागल्याने सर्व पुस्तकं जळून गेली. या घटनेनंतर मी पोलिसांना माहिती देत तक्रार नोंदवली. कन्नड भाषेला (Kannada Language) विरोध करणाऱ्यांनीच माझ्या लायब्ररीला आग लावली असा आरोप त्यांनी केला आहे. ज्यांना कन्नड भाषा आवडत नाही, त्यांनीच ही घटना घडवून आणली आहे. या भागात शिक्षण व्यवस्था अत्यंत कुचकामी असून लायब्ररी गरजेची असल्याचं त्यांनी सांगितलं.
सैयद इसाक यांची लायब्ररी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं समजताच लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वयंस्फुर्तीनं त्यांना मदत करण्याची योजना आखली. या माध्यमातून आता पर्यंत त्यांना 13 लाख रुपयांची रक्कम जमा करुन देण्यात आली आहे. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. या भागात शिक्षण व्यवस्था (Education System) सक्षम असणं गरजेचं आहे, असं इसाक यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.